Budget 2021-22 : कृषी, आरोग्य, शिक्षणासाठी काय तरतूद?, सामान्यांना कोणता दिलासा?, अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष

कोरोना संसर्गामुळे मंदावलेली अर्थव्यस्थ्या, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करेल. (Budget 2021 LIVE News updates marathi)

Budget 2021-22 : कृषी, आरोग्य, शिक्षणासाठी काय तरतूद?, सामान्यांना कोणता दिलासा?, अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष
BUDGET
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 7:49 AM

मुंबई : कोरोना संसर्गामुळे मंदावलेली अर्थव्यस्थ्या, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (Budget) सादर करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोना महामारी, अर्थव्यस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Budget 2021 LIVE News updates marathi FM Nirmala Sitharaman Budget Speech Latest Updates)

कोरोना महामारीमुळे उद्योग, सेवा, उत्पादन आदी क्षेत्रातील उद्योगांना सुस्ती आलेली आहे. दुसरीकडे उलाढालच मंदावल्यामुळे केंद्राला मिळणारा कररुपी पैसाही काही प्रमाणात कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱे व्यापार आक्रसले आहेत. या सर्व बाबींचे आव्हान सध्या देशासमोर आहे. त्यामुळे यावेळी उद्योग, सेवा क्षेत्र रुळावर येण्यासाठी सरकारला भरीव तरतूद करावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद?

तसेच, कोरोना महामारीमुळे जगातील सर्व देश हैराण आहे. सध्या देशात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. अजूनही कोरोना संसर्ग पूर्णपणे थांबवता आलेला नाही. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी, देशात होत असलेले लसीकरण आणि सामान्य नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन यावेळी सरकार आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे.

कृषी क्षेत्राला काय मिळणार?

कोरोना महामारीचा फटका संपूर्ण क्षेत्राला बसला. अनेकांचे रोजगार गेले. कित्येक लघू, शूक्ष्म आणि मध्यम उद्योग बंद पडले. तर कित्येक उद्योगांचे अर्थकारण पूर्णपणे रुळावर आलेले नाही. मात्र या सर्वांमध्ये शेतीक्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्राला कोरोनाचा कोणताही प्रत्यक्ष फटका सहन करावा लागला नाही. कोरोनाकाळात शेती क्षेत्राने चांगली झेप घेतल्याचे दिसले. तरीसुद्धा कृषीक्षेत्राची हीच घोडदौड कायम ठेवण्यासाठी सरकार यावेळी शेती क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, कर्जपुरवठा किंवा इतर गोष्टींची गरज लक्षात घेता सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव उपायोजना लागू करण्याची शक्यता आहे. देशभरात कृषी कायद्यांना होत असलेला विरोधाच्या पार्श्वभूमीवर यावेळी अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमकं काय असणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

कोरोना टॅक्स येणार?

केंद्र सरकारकडून आगामी अर्थसंकल्पात कोरोना टॅक्स सादर केला जाण्याची शक्यता आहे. कारण कोरोना काळात सरकारने लसीकरण, आर्थिक पॅकेज, उपचारासाठी लागणारी सामग्री यासाठी भरपूर पैसा खर्च केला. याशिवाय आरोग्य विभागातल चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारला पैशांची आवश्यकता लागेल. त्यामुळे कोरोना टॅक्सच्या माध्यमातून हा सर्व पैसा गोळा करुन आणखी जास्त चांगली सुविधा दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2021 कुठे पाहायचा?

केंद्रीय अर्थसंकल्प 2021 चे लोकसभा टीव्ही, राज्यसभा टीव्ही आणि दूरदर्शन यांसारख्या राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. चालू लाईव्ह बजेट पाहण्यासाठी TV 9 MARATHI च्या ट्विटर अकाऊंट आणि यू ट्युब चॅनेलला भेट देऊ शकता. यंदाच्या अर्थसंकल्पाचं प्रक्षेपण TV 9 MARATHI वरही होणार आहे. तसेच बजेट 2021 चे भाषण सरकारच्या अधिकृत वेबसाईट indiabudget.gov.in वरून डाऊनलोड करता येईल.

?बजेट पाहण्यासाठी काय कराल??

?सर्वात अगोदर https://www.tv9marathi.com या वेबसाईटर जा.

? त्या ठिकाणी Tv9 marathi यू ट्युब चॅनलवरही बजेट पाहता येईल.

? Tv9 marathi च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला सगळे अपडेट्स मिळत राहतील.

?सोशल मीडियावर कनेक्ट राहा?

?https://www.facebook.com/Tv9Marathi

?https://twitter.com/TV9Marathi

?https://www.youtube.com/tv9marathilive.

?घरबसल्या फोनवर संपूर्ण बजेट पाहा?

प्रत्येकाला दिवसभर टीव्हीसमोर बसणं अशक्य आहे. त्यामुळे तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल बजेट पाहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. टीव्ही 9 मराठीवर बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. https://www.tv9marathi.com/live-tv या लिंकवर चॅनलही तुम्ही पाहू शकता. शिवाय आमच्या यूट्यूब चॅनलवरही लाईव्ह प्रक्षेपण असेल.

संबंधित बातम्या :

Budget 2021: …तर होमलोन, पगार ते विमा पॉलिसीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल

Budget 2021 LIVE Streaming : अर्थसंकल्प 2021 कधी, कुठे आणि कसा पाहाल?

(Budget 2021 LIVE News updates marathi FM Nirmala Sitharaman Budget Speech Latest Updates)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.