ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांनी ही बातमी वाचाच; अर्थसंकल्पामध्ये कराची केली गेली घोषणा

अर्थसंकल्पामध्ये अशा ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या एकूण बक्षीस रकमेवर रोख कर लागू करण्याचा प्रस्ताव असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांनी ही बातमी वाचाच; अर्थसंकल्पामध्ये कराची केली गेली घोषणा
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 8:34 PM

नवी दिल्लीः केंद्र सरकारने बुधवारी ऑनलाइन गेमिंगमधून जिंकलेल्या एकूण रकमेवर 30 टक्के कर लावण्याबाबतचा प्रस्ताव दाखल केला आहे. यासोबतच सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात सध्याची 10,000 रुपयांची मर्यादा रद्द करण्याची घोषणा केली आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये ऑनलाइन गेमिंगवर टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स (टीडीएस) साठी दोन नवीन तरतुदी आणण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये आर्थिक वर्षात भरलेल्या एकूण विजयी रकमेवर 30 टक्के कर आकारण्याची आणि टीडीएस आकारण्यासाठी सध्याची 10,000 रुपयांची मर्यादा काढून टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे.

जर वापरकर्त्याच्या खात्यातून रक्कम काढली गेली नाही, तर आर्थिक वर्षाच्या शेवटी त्यावर कर कापला जाणार आहे. अर्थसंकल्पानंतर महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, एकूण किंमतीवर जिंकलेल्या एकूण रकमेवर कर लावला जाणार आहे. तर ऑनलाइन गेमिंगसाठी टीडीएस तरतुदीतील अन्य बदल म्हणजे 10,000 रुपयांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.

मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, काही ऑनलाइन गेमिंग कंपन्या बक्षिसाची रक्कम मर्यादेपेक्षा कमी ठेवत असल्याचे कर विभागाला कळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

त्यामुळे ते टीडीएसच्या तरतुदीत समाविष्ट होत नाहीत. सुदिन सबनीस, भागीदार, नांगिया अँडरसन एलएलपी यांनी सांगितले की, ऑनलाइन गेमिंग भारतात खूप लक्षणीय वाढ झाली आहे.

देशातील मोबाइल गेमिंग उद्योग 2025 पर्यंत पाच अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भूतकाळात, या उद्योगावर जीएसटी आणि प्राप्तिकराच्या दृष्टिकोनातून सरकारकडून मोठ्या प्रमाणावर देखरेखीचा विषय राहिलेला आहे.

अर्थसंकल्पामध्ये अशा ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या एकूण बक्षीस रकमेवर रोख कर लागू करण्याचा प्रस्ताव असल्याचेही सांगण्यात आले आहे.

त्यांनी सांगितले की गेमिंग उद्योगाला आपली रणनीती बदलण्याची गरज आहे. कारण ही तरतूद आणि जीएसटी कौन्सिलमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा परिणाम वापरकर्त्यावर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, हे मागील अर्थसंकल्पात सादर केलेल्या क्रिप्टोकरन्सीवर कर आकारणीसारखेच आहे.

ऑनलाइन गेमिंगचे क्षेत्र हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. 2023 मध्ये 5G तंत्रज्ञानाच्या आगमनाने, नेक्स्ट जेन गेमिंग तंत्रज्ञानाचा विस्तार आणखी वेगवान होणार आहे. 2022 मध्ये 15 अब्ज डाउनलोडसह, भारतात मोबाईल गेमसाठी जगातील सर्वात मोठा ग्राहक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.