Budget 2023: भारत स्वतंत्र झाला तेव्हा किती होती सोन्याची किंमत? 10 ग्राम सोन्याचा भाव आश्चर्य करणारा!
गेल्या महिनाभरात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी उसळी घेतली असून, सध्या एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,620 रुपयांवर गेला आहे.
मुंबई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत 2023 चा अर्थसंकल्प सादर केला (Union Budget 2023) असून यावेळी त्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. लोकांना आयकरातही दिलासा मिळाला आहे. गेल्या महिनाभरात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी उसळी घेतली असून, सध्या एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,620 रुपयांवर गेला आहे. इतकंच नाही तर येत्या काळात सोन्याचा भाव 60 हजारांच्या पुढे जाईल असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. बजेटच्या निमीत्यानं एक गमतिशीर गोष्ट जाणून घेऊया . 63 वर्षांपूर्वी सोन्याच्या खरेदीचे बिल सध्या व्हायरल होत आहे.
स्वातंत्र्यानंतर सोन्याची किंमत किती होती?
स्वातंत्र्याच्या काळात सोन्याच्या किमतीचा अंदाज तुम्ही कधी लावला आहे का? आजच्या युगात एका ग्रॅमची किंमत इतकी जास्त आहे की, त्या काळातील लोकं या रकमेत 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं खरेदी करू शकत होते. सोनाराच्या दुकानाचे एक जुने बिल इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यावेळी सोनं कोणत्या किमतीला विकले गेले होते ते पाहिले जाऊ शकते. ही स्लिप 1959 सालची आहे, जेव्हा सोन्याची किंमत 113 रुपये होती. या स्लिपकडे बारकाईने पाहिल्यास बिलात पुण्याचा उल्लेख दिसतो. स्लिपवर दुकानाचे नावही लिहिले आहे.
व्हायरल होत असलेल्या बिलामध्ये काय आहे?
वर M/s वामन निंबाजी अष्टेकर लिहिले आहे आणि तारीख 03 मार्च 1959 लिहिली आहे. ही स्लिप हाताने लिहिलेली आहे. taxguru.in नुसार, 1960 मध्ये सोन्याची किंमत 10 ग्रामसाठी 112 रुपये होती. बिलात 621 आणि 251 रुपयांच्या सोन्याच्या खरेदीचा उल्लेख आहे. या व्यक्तीने सोन्यासोबत चांदीचीही खरेदी केली आहे. एकूण बिलाची रक्कम 909 रुपये लिहिली आहे. हे जुने बिल पाहताच लोकांना आश्चर्य वाटले. एकेकाळी सोने इतके स्वस्त असायचे यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. आजच्या तुलनेत सोन्याची किंमत 524 पट कमी होती.