Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वीच चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांची ‘फिल्डिंग’; विविध योजनांसाठी इतक्या हजार कोटींची केली मागणी

Chandrababu Naidu- Nitish Kumar : चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने आणि नितीश कुमार यांच्या जनता दलाने (संयुक्त) बजेटपूर्वीच निधीसाठी फिल्डिंग लावली. त्यांनी विकास कामांची यादीच वाचून काढली. त्यासाठी इतक्या हजार कोटींची मागणी केली आहे.

Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वीच चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांची 'फिल्डिंग'; विविध योजनांसाठी इतक्या हजार कोटींची केली मागणी
बजेटपूर्वीच बार्गेनिंग पॉवर
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 4:51 PM

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे तिसऱ्यांदा सरकार सत्तेत आले. त्यात तेलगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू आणि जनता दलाचे (संयुक्त) नितीश कुमार यांची महत्वाची भूमिका नाकारुन चालणार नाही. आता त्यांनी बजेटपूर्वीच निधीसाठी आपल्याच सरकारकडे फिल्डिंग लावली आहे. राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी जवळपास 48 हजारा कोटी रुपयांची मागणी केली आहे. जागतिक वृत्ता संस्था रॉयटर्सने शनिवारी 6 जुलै रोजी याविषयीचे एक वृत्त समोर आणले आहे. रॉयटर्सच्या वृ्त्तानुसार, दोन्ही प्रमुख पक्षांनी चालू आर्थिक वर्षांसाठी मोठे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. याशिवाय पायाभूत सुविधांसाठी पण भलीमोठी यादी दिल्याचे समोर येत आहे.

TDP आणि JDU मुरलेले खेळाडू

16 खासदारांसह तेलगू देसम पक्ष तर 12 खासदारांसह जनता दलाचे (संयुक्त) 12 खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इच्छित आकडा गाठता आला नाही. त्यांना तिसऱ्यांदा सरकार स्थापन्यासाठी या दोन्ही पक्षांची मदत झाली. या आघाडी सरकारमध्ये आता घटक पक्षांची मर्जी सुद्धा भाजपला सांभाळावी लागणार आहे. यापूर्वी दोन्ही वेळा भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याने त्यांना घटक पक्षांची गरज पडली नव्हती. पण यावेळी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.

हे सुद्धा वाचा

ब्लूमबर्गचा अहवाल सांगतो काय?

Bloomberg च्या एका अहवालानुसार, चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्या राज्यातील विविध योजनांसाठी 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची मागणी केली आहे. टीडीपी सुप्रीमो या जुलैच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यांच्या मागण्या रेटल्याचा दावा करण्यात आला आहे.

Moneycontrol नुसार, आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावतीच्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी आणि पोलावरम सिंचन योजनेसाठी चंद्रबाबू नायडू यांनी निधीची मागणी केली आहे. याशिवाय विजयवाडा, विशाखापट्टणम आणि अमरावती मेट्रो प्रोजेक्ट, एक लाईट रेल्वे योजना. विजयवाडा येथून नवी दिल्ली आणि मुंबईला जोडणारी वंदे भारत ट्रेन यासाठी आणि इतर अनेक योजनांसाठी केंद्रावर दबाव टाकला आहे.

तर बिहारमध्ये नवीन 9 विमानतळं, दोन ऊर्जा निर्मिती प्रकल्प, दोन नद्यांच्या विकासाची योजना, 7 शासकीय वैद्यकिय महाविद्यालये तसेच इतर अनेक योजनांसाठी नितीशबाबूंनी पण एक लांबलचक यादी केंद्र सरकारच्या हातात दिली आहे. दोन्ही राज्यांनी केंद्राकडे दीर्घकालीन 1 लाख कोटींचे कर्ज विनाअट मंजूर करण्याची पण गळ घातली आहे. आता राज्यातील महायुती सरकार केंद्राला काय गळ घालते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.