Budget 2024 : सुरक्षित प्रवासाचा भरवसा, प्रत्येकाच्या हाती झटपट तिकीट, बजेटमध्ये रेल्वेसाठी काय असतील खास तरतुदी

Budget 2024 Railway : पुढील आठवड्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वेच्या आधुनिकि‍करणासह झटपट तिकीट आणि सुरक्षित प्रवासाविषयी मोठ्या घोषणा होऊ शकतात. काय आहे आहेत बजेटकडून प्रवाशांना अपेक्षा?

Budget 2024 : सुरक्षित प्रवासाचा भरवसा, प्रत्येकाच्या हाती झटपट तिकीट, बजेटमध्ये रेल्वेसाठी काय असतील खास तरतुदी
स्वतंत्र रेल्वे बजेट बंद करण्यात आले. रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर करण्याची पंरपरा संपुष्टात आणण्याची सूचना तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली होती.
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 3:19 PM

देशात सार्वजनिक दळणवळणासाठी भारतीय रेल्वे हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. दररोज लाखो लोक ट्रेनच्या माध्यमातून एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतात. तर काही शहरात रेल्वे ही जणू लाईफलाईन आहे. या जीवनरेखाशिवाय दळणवळणाची कल्पनाच करता येत नाही. सध्या रेल्वेच्या अपघाताची मालिका चर्चेचा विषय आहे. तर वेटिंग तिकिटाविषयीची नाराजी पण आहेत. याशिवाय या बजेटकडून प्रवाशांना अनेक अपेक्षा आहेत. हे बजेट या अपेक्षांवर खरे उतरणार का? असा सवाल प्रवशांचा आहे.

रेल्वेवर मोदींचा फोकस

पुढील आठवड्यात मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले बजेट सादर होणार आहे. त्यामुळे तिकीट वेटिंग आणि अपघाताची मालिका खंडित करण्यावर जोर देण्यात येऊ शकतो. गेल्या दशकात मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वे विभागात अनेक महत्वपूर्ण बदल दिसून आले. अनेक सुधारणा दिसून आल्या. वंदे भारत रेल्वे, नवीन रेल्वे लाईन, रेल्वेचे आधुनिकीकरण असे अनेक बदल दिसले. रेल्वे रुळ बदलणे आणि विद्युतीकरणाचे आधुनिक वारे वाहिले. त्यामुळे प्रवाशांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

हे सुद्धा वाचा

आता आघाडी सरकार

गेल्या दहा वर्षात भाजपने बहुमताच्या जोरावर सरकार खेचून आणले. पण आता घटक पक्षांच्या सहकाऱ्याने मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. जनता दल (संयुक्त ) आणि तेलगू देसम पक्षाचा टेकू घ्यावा लागला आहे. या दोन्ही पक्षांनी अनुक्रमे बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी अनेक योजनांची मागणी केली आहे. रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी हे पक्ष आग्रही आहेत.

रेल्वे बजेटकडून मोठ्या अपेक्षा

प्रवाशांना या रेल्वे बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नवीन रेल्वेची मागणी करण्यात येत आहे. तर तिकीटासाठी काऊंटरवरची लांबच लांब रांग कमी व्हावी, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. नवीन रेल्वे सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेतील गर्दीचा सामना करावा लागणार नाही. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांच्या घटना घडत आहेत. त्यावरुन प्रवासी चिंतेत आहे. ते सुरक्षित प्रवासाची मागणी करत आहेत.

जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.