Budget 2024 | बजेट भाषणात सीतारामन यांनी टॅक्स शब्द 42 वेळा उच्चारला, परंतू दिलासा मिळण्यासाठी जुलै उजाडणार
टॅक्सवर चर्चा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांचे आभार मानले आहे. गेल्या दहा वर्षांत प्रत्यक्ष कर ( डायरेक्ट टॅक्स ) संग्रह तीन पट वाढला आहे. रिर्टन दाखल करणाऱ्यांची संख्या 2.4 पट वाढली आहे. करदात्यांच्या पैशांचा उपयोग देशाचा विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी कौशल्याने केला आहे. करदात्यांच्या पाठींब्याचे मी आभार मानत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : निवडणूक वर्षांचे अंतरिम बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केले आहे. कर सवलतीची वाट पाहणाऱ्या मध्यम वर्गीयांना कोणताही दिलासा न मिळाल्याने या बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा टाळल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी गेल्या दहा वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला आहे. आता सरकारचे लक्ष्य येत्या साल 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचे आहे. तसेच जुलै महिन्यात होणाऱ्या बजेटबाबत निर्मला सीतारामन यांनी इशारा केला आहे.
या अंतरिम बजेटला सादर करताना आपल्या भाषणात सीतारामन यांनी 42 वेळा टॅक्स शब्दाचा वापर केला. परंतू मध्यमवर्गीयांना टॅक्स सवलतीतून दिलासा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी परंपरेचे पालन करीत अंतरिम बजेटमध्ये टॅक्स रिलीफ बाबत काहीही वक्तव्य केले नाही. त्यामुळे आता मध्यमवर्गीयांना आता जुलै 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जर लोकसभेच्या निवडणूकांनंतर पुन्हा मोदी सरकार आले तर जुलै महिन्यात सादर होणाऱ्या संपूर्ण बजेट यासंदर्भात घोषणा होऊ शकते.
निर्मला सीतारामन यांचा इशारा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या तासभर चाललेल्या बजेट भाषणात सार्वजनिक निवडणूकांनंतर त्यांचे सरकार येणार असल्याचे संकेत दिले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साल 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या सरकारच्या व्हीजनची चर्चा केली. येत्या निवडणूकांनंतर पुन्हा एनडीएचे सत्ता येणार असल्याबद्दल सीतारामन यांनी आत्मविश्वास दाखविला. जेव्हा या वर्षी जुलै महिन्यात संपूर्ण बजेट त्यांचे सरकार सादर करेल तेव्हा 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य कसे गाठले जाईल याचा संपूर्ण रोडमॅप त्या बजेटमध्ये मांडला जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
जुलैच्या बजेटमध्ये विकसित भारताचा रोड मॅप
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपले सरकार अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. सरकार उच्च विकास करुन अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याबरोबर लोकांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी कटीबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणाचा हवाला देऊन सीतारामन यांनी नव्या प्रेरणा, नव्या चेतना आणि नवीन संकल्पाचा ध्यास घेऊन देशाचा विकासासाठी आपण प्रतिबद्ध होऊया, हा अमृतकाल आमच्यासाठी कर्तव्यकाल असल्याचेही त्यांनी सांगितले. साल 2014 च्या सर्व आव्हानांना आर्थिक व्यवस्थान आणि गर्व्हनर्सच्या माध्यमातून आम्ही दूर केल्याने देश विकासाच्या नियमित मार्गावर पुढे जात आहे. येत्या जुलैच्या संपूर्ण बजेटमध्ये आम्ही विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठीचा विस्तृत रोड मॅप सादर करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
यंदा कोणताही बदल नाही
कर प्रस्तावाचा विचार करताना परंपरा ध्यानात घेऊन यंदा कोणताही बदल केलेला नाही.आयात शुल्क सहीत प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करांसाठी समान कर दर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक निवडणूकांआधीच्या अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय घोषणा न करण्याची परंपरा पाळण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर निवडणूकानंतर सरकार पुन्हा आले तर जुलैमध्ये होणाऱ्या संपूर्ण बजेटमध्ये सरकार कर सवलत देण्याची घोषणा करु शकते असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
टॅक्स, पीएम आणि पॉलीस शब्दांवर भर
निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणात टॅक्स, पॉलिसी, पंतप्रधान, गर्व्हमेंट आणि भारत सारखे शब्दाचा अधिक वापर झाला. टॅक्स शब्दाचा 42 वेळा उच्चार केला. पीएम शब्दाचा 42 वेळा उच्चार झाला. पॉलिसी शब्दाचा 35 वेळा, सरकार शब्दाचा 26 वेळा, भारत शब्दाचा 24 वेळा, महिला शब्दाचा 19 वेळा, स्कीम शब्दाचा 16 वेळा उच्चार झाला. किसान, फायनान्स, ग्लोबल शब्द प्रत्येकी 15 वेळा भाषणात आला.