Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण थोड्याच वेळात सादर करतील बजेट; दिवसभरात काय काय होणार, असे आहे शड्यूल
Budget 2024 Timeline: मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प अगदी थोड्याच वेळात सादर होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सकाळी 11 वाजता संसदेत बजेट सादर करतील. याविषयीच्या कार्यक्रमाची अशी आहे अपडेट.
मोदी 3.0 सरकारचा हा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आहे. अवघ्या काही तासात निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री केंद्रीय बजेट सादर करतील. त्याविषयीची संपूर्ण तयारी झाली आहे. यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केले होते. त्यावेळी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्पात भारत 2047 चे चलचित्र असेल, रोडमॅप असेल हे स्पष्ट केले होते. या बजेटकडून संपूर्ण देशवासीयांना मोठ्या अपेक्षा आहे. मध्यमवर्ग, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना सरकारकडून मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
असं आहे शड्यूल
1. सकाळी 8-9 वाजेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री त्यांच्या निवासस्थानाहून निघतील.
2. सकाळी 9 वाजता अर्थमंत्री आणि अर्थ खात्यातील त्यांचे सहकारी राष्ट्रपती भवनाकडे निघतील.
3. सकाळी 10 वाजता अर्थमंत्री आणि राज्य अर्थमंत्री अर्थसंकल्पासह संसद भवनात प्रवेश करतील. येथे माध्यमांना ते अर्थसंकल्पाच्या चोपडी दाखवतील.
4. सकाळी 10:15 वाजता बजेट कॅबिनेटसमोर सादर करण्यात येईल.
5. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प वाचायला सुरुवात करतील.
6. दुपारी 3 वाजता केंद्रीय अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद
अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण
आज अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहता येईल. याशिवाय तुम्ही डीडी नॅशनलवर थेट प्रक्षेपण पाहू शकता. तुमच्या फोनवर लाईव्ह टेलिकास्ट पहायचे असेल, तर तुम्ही ते डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता.
संसद टीव्ही दूरदर्शन प्रसारण संसद टीव्ही आणि दूरदर्शनचे YouTube चॅनल थेट प्रवाह वित्त मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट थेट प्रवाह बजेट 2024 तारीख आणि वेळ Tv9 मराठीच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर तुम्ही टीव्ही लाईव्ह पाहू शकता.
येथे पाहा बजेटच्या ताज्या अपडेट्स
अर्थसंकल्प येथून करा डाऊनलोड
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणांचे सर्व तपशील सरकारद्वारे अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. www.indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला तुम्ही हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बजेट दस्तऐवज पाहू शकाल. हे PDF स्वरूपात उपलब्ध असतील, जे तुम्ही डाउनलोड, पाहू आणि वाचू शकता.
सीतारमण यांचे 7 वे बजेट
निर्मला सीतारमण यांचे हे सलग 7 वे बजेट आहे. हा एक विक्रम असेल. आतापर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्यांने सलग बजेट सादर केलेले नाही. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यापूर्वी सीतारमण यांनी 2019 आणि 2024 मध्ये दोन अंतरिम बजेट आणि चार पूर्ण बजेट सादर केले आहेत.