Budget 2024 : अर्थसंकल्प तर सादर झाला, पण कधी होणार लागू? माहिती आहे का उत्तर
Budget Into Effect : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया पण आल्या. निवडणूक वर्ष असल्यानं यंदा दोनदा अर्थसंकल्प सादर झाला. आता हे बजेट कधी लागू होणार माहिती आहे का?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी 23 जुलै रोजी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या 3.0 कार्यकाळातील हे पहिले बजेट आहे. तर निर्मला सीतारमण यांचे हे सातवे बजेट आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असते. एका वर्षाकरीता त्यात खर्च आणि आर्थिक तरतूदी करण्यात येतात. साधारणपणे अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्यात पहिल्या दिवशी सादर करण्यात येतो आणि हे बजेट 1 एप्रिलपासून लागू करण्यात येते. पण आता 23 जुलै रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मग आता हा अर्थसंकल्प कधी सादर करण्यात येणार? तुम्हाला माहिती आहे का उत्तर?
वैधानिक प्रक्रियेतून जाणार अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्प, अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक बाबींशी संबंधित विभाग (DEA) तयार करतो. अर्थमंत्री तो सादर करतो. आगामी आर्थिक वर्षातील खर्च आणि आवक यांची सांगड यामध्ये घालण्यात येते. बजेट संसदेसमोर सादर झाल्यावर ते वैधानिक प्रक्रियेतून जाते. विनियोग विधेयक आणि वित्त विधेयक संसदेत मंजूर करण्यात येते. त्याचे कायद्यात रुपांतरासाठी राष्ट्रपती आणि संसदेची मंजुरी घेण्यात येते. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ते लागू होतात. म्हणजे अर्थसंकल्पाची सुरुवात होते.
निवडणुकीवेळी येते अंतरिम बजेट
ज्या वर्षी लोकसभा निवडणूक येते, त्या वर्षी निवडणुकीपूर्वी अंतरिम बजेट आणि नवीन सरकारच्या स्थापनेनंतर सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. यंदा फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट सादर करण्यात आले. एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणुकीचा हंगाम होता.
अंतरिम बजेटमध्ये नवीन आर्थिक वर्षात नवीन सरकारची स्थापन होईपर्यंत संभावित कालावधीतील खर्चासाठी संसदेची मंजुरी घेण्यात येते. त्यासाठी अंतरिम बजेट सादर करण्यात येते. तर निवडणुकीनंतर नवीन सरकार सत्तेवर येताच उर्वरीत वर्षातील खर्च आणि महसूलाचा ठोकताळा तयार करण्यासाठी पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येतो.
मग केव्हापासून लागू होईल हे बजेट
या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जुलै 2024 पर्यंत म्हणजे 4 महिन्यांचा जो खर्च करण्यात येणार होता, त्याची मंजुरी संसदेत अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. आता उर्वरीत आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प लागू होईल. ऑगस्ट 2024 ते मार्च 2025 साठी हा अर्थसंकल्प लागू होईल.