Budget 2024 : महिलांसाठी योजनांचा धमाका; Health Subsidy पासून ते करातून अशी मिळते सवलत

Women Empowerment : यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांसाठी योजनांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. यापूर्वी महिला सक्षमीकरणासाठी काही योजना राबविण्यात आल्या. आता देशातील कोट्यवधी महिलांची बजेटकडे नजर लागली आहे.

Budget 2024 : महिलांसाठी योजनांचा धमाका; Health Subsidy पासून ते करातून अशी मिळते सवलत
बजेटमध्ये महिलांसाठी योजनांचा पाऊस
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 4:53 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यंदा त्या महिलांसाठी आनंदवार्ता देतील. देशातील महिलांसाठी त्या मोठ्या घोषणा करु शकतील. यामध्ये घरगुती गॅसच्या दरात कपातीपासून ते सबसिडीपर्यंत दिलासा मिळू शकतो. महिलांच्या सशक्तीकरणासाठी लखपती दीदी योजनेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. महिला व्यावसायिकांना या योजनेत कर सवलत देण्याची शक्यता आहे. इतर पण अनेक योजनांचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे महिलांचे आयुष्य बदलण्याची शक्यता आहे.

लखपती दीदीत मोठा बदल

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने अंतरिम बजेट 2024 मध्ये लखपती दीदी योजनेची सुरुवात केली होती. यामध्ये लखपती दीदी एका स्वयं सहायता समूहाची सदस्य होते. एका वर्षात महिला 1 लाख वा त्यापेक्षा अधिकची कमाई करु शकते. अनेक जिल्ह्यातील महिलांना त्याचा फायदा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता महिला आगामी बजेटमध्ये या योजनेचा परीघ वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यापूर्वीच मोदी सरकारने या योजनेचे उद्दिष्ट्य 2 कोटींहून 3 कोटी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

महिलांना करणार वाटेकरी

आयटी कंपनीत काम करणाऱ्या अथवा व्यवसाय करणाऱ्या, घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना या बजेटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना या उद्योग वाढीसाठी कर्जाची गरज असते. अनेक महिला बँकेतून कर्ज काढतात. एखाद्या योजनेत कर्ज मिळवले असेल तर या उद्योगावरील गुंतवणूक आणि लाभावर कर सवलत आणि कपातीचा लाभ देण्याची मागणी करण्यात येत आहे.

आरोग्य सेवांवर सबसिडी

देशातील अनेक कुटुंबांचा सध्या महागाईशी दोन हात करण्यात वेळ जात आहे. त्यासोबतच महागडी औषधं आणि उपचाराचा खर्च यावरही मोठा खर्च होतो. सिलेंडरचा वाढता खर्च यामुळे घर चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे गॅस सबसिडी आणि उपचारांवरील खर्च कमी करण्यासाठी बजेटमध्ये मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. सरकार आयुष्यमान भारत योजनेतंर्गत विमा रक्कम वाढविण्याचा निर्णय जाहीर करु शकतो. तर सरकारच्या तिजोरीवर 12,706 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. 70 वर्षांवरील नागरिकांसह या योजनेत जवळपास 4-5 कोटी लाभार्थी सहभागी होतील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.