Budget : अर्थमंत्री रेल्वे भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना सूट बहाल करणार का ? सवलत बंदीनंतर रेल्वेची झाली इतकी कमाई
रेल्वे प्रवासातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंदी करुन रेल्वेला काही फारसी कमाई झालेली नाही. रेल्वेच्या एकूण उत्पन्नापेक्षा ही रक्कम खूपच कमी असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा बहाल करण्याची मागणी त्यांनी पत्र लिहून केली होती.
संसदेत या वर्षांचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात यंदा ज्येष्ठ नागरिकांना बंद केलेली रेल्वे प्रवासातील सवलत पुन्हा सुरु होणार का ? असा सवाल केला जात आहे. रेल्वेने कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी सवलत बंद केली होती. कोरोनाची साथ बंद झाल्यानंतर ही सवलत पूर्ववत सुरु होण्याची गरज होती. परंतू रेल्वेने या सवलतीला पुन्हा बहाल केलेले नाही. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचे देखील यंदाच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या अर्थ संकल्पात जेष्ठ नागरिकांची प्रवासी सवलत पुन्हा बहाल केली जाण्याची आशा आहे.
लोकसभेत येत्या 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सितारमन अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. या अर्थ संकल्पात सिनियर सिटीझनना रेल्वे प्रवासातील सवलत पुन्हा बहाल केली जाणार का ? याकडे डोळे लागले आहेत. या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सवलत सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सवलत बहाल केली जाणार का? याकडे ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भारतीय रेल्वेत अनेक वर्षांपासून प्रवाशांना सवलत दिली जात आहे.मार्च 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांची ही सवलत बंद केली होती. त्यानंतर ही सवलत पुन्हा बहाल करण्याची मागणी गेली अनेक वर्षे करीत आहे. रेल्वे प्रवासात 58 वर्षांवरील महिलांना तिकीटात 50 टक्के तर 60 वर्षांवरील पुरुषांना तसेच तृतीय पंथीयांना 40 टक्के सुट दिली जाते. राजधानी, शताब्दी, दुरंतो आणि जनशताब्दी ट्रेन सह सर्व प्रकाराच्या ट्रेनमध्ये ही सवलत दिली जात होती.
डिसेंबर 2023 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेने 2019-20 मध्ये समाजातील सर्व वर्गांना ध्यानात ठेवून तिकीटांवर 59,837 कोटींची सबसिडी दिली आहे. प्रत्येक प्रवाशामागे रेल्वे 53 टक्के सवलत देत आहे. ही सबसिडी समाजातील काही घटकांसाठी सुरुच राहणार असून यात अपंग व्यक्ती ( चार श्रेणी ), रुग्णांची ( 11 श्रेणी ) आणि विद्यार्थ्यांसाठी ( 8 श्रेणी ) सह विविध समाज घटकांची सवलत सुरु राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
सवलत बंदीनंतर रेल्वेची कमाई –
रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी सवलत बंद केल्यानंतर रेल्वेच्या कमाईत वाढ झाली आहे. रेल्वेने माहीतीच्या अधिकारात दिलेल्या माहीतीत एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या काळात 8 कोटी नागरिकांना सवलत दिली नाही. यात 4.6 कोटी पुरुष, 3.3 कोटी महिला आणि 18,000 तृतीयपंथीय सामील आहेत.या काळात ज्येष्ठ नागरिकांकडून 5,062 कोटीचा महसूल मिळाला आहे. यात सबसिडी बंद केल्याने 2,242 कोटीच्या अतिरिक्त महसूलाचा समावेश आहे.