Budget 2023-2024 : बजेटला जाण्यापूर्वी देवपूजा; भागवत कराड म्हणाले, सर्वसामान्यांना काय मिळणार…

कोविडनंतर देशाची रिकव्हरी चांगली झाली आहे. इकॉनॉमी सर्व्हे पाहिला तर प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती झाली असल्याचं दिसून येतं. इतर देशाच्या तुलनेत आपली प्रगती होत आहे.

Budget 2023-2024 : बजेटला जाण्यापूर्वी देवपूजा; भागवत कराड म्हणाले, सर्वसामान्यांना काय मिळणार...
dr. bhagwat karadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 9:14 AM

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारचा 2024च्या निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी केंद्र सरकार देशातील आम जनतेला काय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासकरून शेतकरी, हेल्थ सेक्टर, उद्योग आणि नोकरदार वर्गासाठी काय घोषणा होतात याकडे देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पोहोचल्या आहेत. तर अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड हे देवपूजा करूनच संसदेत पोहोचले. सकाळी 11 वाजता सीतारामण देशाचा बजेट सादर करणार आहेत.

आज सकाळी 11 वाजता बजेट सादर केला जाणार आहे. त्यामुळे बजेटचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. निर्मला सीतारामण संसदेत पोहोचल्या आहेत. बजेटला जाण्यापूर्वी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी देवपूजा केली. घरात देवाची आरती केली. देवाचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतरच ते संसदेकडे जायला निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवादही साधला.

हे सुद्धा वाचा

आजच्या अर्थसंकल्पातून जनतेला काय मिळणार? असा सवाल भागवत कराड यांना करण्यात आला. त्यावर सामान्य जनतेला काय मिळणार हे तुम्हाला 11 वाजता कळेल. तूर्तास मी कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही. मी एवढंच सांगतो, 11 वाजता बजेट सादर होणार आहे. त्यातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असं भागवत कराड म्हणाले.

देशाची प्रगती होतेय

कोविडनंतर देशाची रिकव्हरी चांगली झाली आहे. इकॉनॉमी सर्व्हे पाहिला तर प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती झाली असल्याचं दिसून येतं. इतर देशाच्या तुलनेत आपली प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014मध्ये सत्तेत आले. तेव्हा आपला देश 10व्या स्थानी होता. तो आता पाचव्या स्थानी आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रपतींनी भेटणार

बजेटपूर्वी मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहे. त्यानंतर कॅबिनेट बैठक होईल. नंतर आज 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, भागवत कराड हे संसदेत पोहोचले. संसदेत त्यांनी निर्मला सीतारामण यांची भेट घेतली. सीतारामण आणि कराड यांनी हातात बजेटची कॉपी घेऊन मीडियाला फोटोही दिले. त्यानंतर हे दोन्ही नेते राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.