गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, भांडवलावरील नफ्यासाठी 1 वर्षांसाठी करात सूट

भांडवली गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्याबाबत सरकारने काही दिलासा दिलाय. यानुसार भांडवल गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यावर पुढील एक वर्षांसाठी सूट देण्यात आलीय.

गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, भांडवलावरील नफ्यासाठी 1 वर्षांसाठी करात सूट
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 3:02 PM

नवी दिल्ली : करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून (Budget 2021) बऱ्याच आशा होत्या, मात्र त्यांच्यासाठी कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. असं असलं तरी भांडवली गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्याबाबत सरकारने काही दिलासा दिलाय. यानुसार भांडवल गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यावर पुढील एक वर्षांसाठी सूट देण्यात आलीय. स्टार्टअपसाठी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी भांडवली नफ्यावर (Capital Gain) टॅक्स हॉलिडे अंतर्गत देण्यात येणाऱ्या सवलतीचा कालावधी 1 वर्षाने वाढवण्यात आलाय. आता 31 मार्च 2022 पर्यंत या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाहीये. याआधी ही सूट 31 मार्च 2021 रोजी संपणार होती (Exemption on capital gains on investment in startups extended by 1 year Budget 2021).

पंतप्रधान मोदींनी 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया कार्यक्रम लाँच केला होता. यातून नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देणं हा हेतू होता. आत्ताची भांडवली नफ्यावरील कराची सवलत देखील या अंतर्गत येणाऱ्या सरकारची मान्यता प्राप्त स्टार्टअप्सलाच आहे. या स्टार्टअप्सला त्यांच्या 7 वर्षांच्या कालावधीपैकी 3 वर्षांसाठी करात सवलत देण्यात आलीय.

आर्थिक सर्वेक्षणानुसार, देशात सध्या सरकारने मान्यता दिलेले 41 हजार 61 स्टार्टअप्स आहेत. यापैकी 39000 स्टार्टअप्समध्ये 4.7 लाख लोकांना रोजगार मिळालाय. कॅपिटल गेनवर दोन पद्धतीने कर लागतो. एक 12 महिन्यांपर्यंत शॉर्ट टर्म कॅपिटल गेननुसार (STCG) कर आकारणी आणि दुसरा लाँग टर्म कॅपिटल गेननुसार (LTCG) कर आकारणी. वर्तमानात 1 लाखापर्यंतच्या LTCG वर कर आकारणी केली जात नाही. यानंतर 10 टक्के दराने कर आकारणी होते. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर सध्या 15 टक्के कर आकारणी केली जाते.

75 वर्षांपेक्षा अधिक करदात्यांना सवलत

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांसाठी आणखी एक दिलासा दिलाय. त्या म्हणाल्या, “75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या करदात्यांना यापुढे इनकम रिटर्न भरणं गरजेचं असणार नाही. असं असलं तरी या सवलतीचा लाभ तेच नागरिक घेऊ शकतात ज्यांचा उत्पन्नाचा मार्ग केवळ पेन्शन आहे. त्यांचा कर त्यांच्या उत्पन्नातूनच कपात केला जाईल.”

हेही वाचा :

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Budget 2021-22 : तुमच्याकडेही 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे? Scrappage Police चा परिणाम काय?

पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन लोकांना मारायचं आहे, संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

Exemption on capital gains on investment in startups extended by 1 year Budget 2021

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.