Budget 2023 : बजेट सादर करताना अर्थमंत्री चुकल्या… अन सभागृहात सर्वांनाच झालं हसू अनावर

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सभागृहात सर्वजण गंभीरपणे त्यांचे भाषण ऐकत होते. मात्र बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे सर्वांनाच हसू फुटलं.

Budget 2023 : बजेट सादर करताना अर्थमंत्री चुकल्या... अन सभागृहात सर्वांनाच झालं हसू अनावर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 4:29 PM

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (union budget 2023)सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या बजेटमधील एक महत्वाची घोषणा म्हणजे सामान्य जनतेला सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत (tax) दिल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये अनेक घोषणा केल्या, सभागृहात सर्वजण गंभीरपणे त्यांचे भाषण ऐकत होते. मात्र त्याच वेळी निर्मला सीतारमण यांच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे (mistake) सर्वानांच हसू फुटलं. त्यामुळे संसदेचे गंभीर वातावरण हलकं-फुलकं झालं. अर्थमंत्र्यांनाही आपली चूक लक्षात येताच हसू आवरलं नाही, त्यांनी हसतच माफी मागितली आणि भाषणात दुरुस्ती केली.

नेमकं काय झालं ?

प्रदूषण करणारी वाहने हटवण्यासदंर्भात बोलताना अर्थमंत्री सीतारमण यांना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेइकल्स’ असे म्हणायचे होते, मात्र त्यांनी त्याऐवजी चुकून ‘ओल्ड पॉलिटीकल व्हेइकल्स’ असा उच्चार केला. त्यांचा हा शब्द ऐकताच सभागृहात एकच हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरींसह सर्वजण हसू लागले. सीतारमण यांनाही त्यांची चूक लक्षात आली व त्याही हसू लागल्या. मात्र त्यानंतर त्यांनी सभागृहात माफी मागितली आणि त्यांच्या भाषणात दुरूस्ती करत भाषण पुढे सुरू ठेवले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान दुसरीकडे, वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी म्हणजेच जुनी वाहनं भंगारात काढण्यासाठी अधिक निधी दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येईल, असेही अर्थमंत्र्यांनी नमूद केले.

बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा

अर्थसंकल्प 2023 लाईव्ह टीव्ही

Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.