नवी दिल्लीः देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज गरीबांसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा केली. संसद भवनात अर्थसंकल्प (Budget) मांडताना त्या म्हणाल्या, आता देशातील कुणीही व्यक्ती भूकेने व्याकुळ राहून रात्र काढणार नाही. १ जानेवारी २०२४ पर्यंत आर्थिक (Financial) दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना मोफत रेशन दिले जाईल. जेणेकरून या लोकांना पुरेसं अन्न मिळेल. देशात कुणीही उपाशी राहणार नाही. देशातील प्रत्येक टप्प्यावरील जनतेची काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात येईल, असं आश्वासन निर्मला सीतारमण यांनी दिलंय. त्यानुसार त्यांनी मोफत रेशनच्या योजनेची घोषणा केली.
केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपये खर्च केले.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना ही माहिती दिली.