Vehicles scrapping Budget 2021: जुन्या वाहनांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, 5 वर्ष जास्त काळ चालवू शकाल गाडी
निर्मला सीतारामण यांनी सोमवारी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. | vehicles scrapping policy for Budget 2021
नवी दिल्ली: आगामी काळात देशातील खासगी आणि व्यावसायिक वाहनांची फिटनेस टेस्ट होईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Sitharaman) यांनी केली. या निर्णयानुसार खासगी वाहनांची 20 वर्षानंतर तर व्यावसायिक वाहनांची 15 वर्षानंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी होईल. सरकारने ठरवून दिलेल्या फिटनेस सेंटरमध्ये ही तपासणी होईल, असे निर्मला सीतारामण यांनी जाहीर केले. मात्र, ही चाचणी ऐच्छिक असेल, असेही निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले. (Budget 2021 LIVE News updates vehicles scrapping policy)
निर्मला सीतारामण यांनी सोमवारी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे इंधनाची बचत, पर्यावरणाची हानी आणि प्रदूषण रोखले जाईल. तसेच इंधनाच्या आयातीवरील खर्चही कमी होईल, असे निर्मला सीतारामण यांनी सांगितले.
नितीन गडकरींनी दिले होते संकेत
काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी वाहने भंगारात काढण्याच्या योजनेचे (scrapping policy) संकेत दिले होते. भारतातील सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहनं आता थेट भंगारात जाणार आहेत. वाहनांना स्क्रॅप करण्याच्या धोरणाला (Vehicle Scrappage Policy) लवकरच अधिसूचित केले जाणार असून, 1 एप्रिल 2022 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन भंगार धोरणाला मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले होते.
Over 13,000 km length of roads at a cost of Rs 3.3 lakh cr has already been awarded under Rs 5.35 lakh cr Bharatmala project of which 3,800 kms have been constructed. By March 2022 we’d be awarding another 8,500 & complete an additional 11,000 kms of National Highway Corridor: FM pic.twitter.com/B2umFTMLxC
— ANI (@ANI) February 1, 2021
संबंधित बातम्या:
15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी
Budget Marathi 2021 LIVE : सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द
Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा
Budget 2021: अर्थसंकल्पाच्या दिवशीच विमान प्रवाशांना धक्का; जेट इंधन महागले
(Budget 2021 LIVE News updates vehicles scrapping policy)