Budget 2024 : बजेटनंतर स्वस्त होऊ शकते सोने; केंद्र सरकारच्या काय मेगा प्लॅन?

Budget 2024 Gold : या महिन्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. किंमतीत मोठी घसरण झाली आहे. पण गेल्या दहा वर्षांत मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने ग्राहक नाराज आहेत, या बजेटमध्ये ही नाराजी दूर होऊ शकते.

Budget 2024 : बजेटनंतर स्वस्त होऊ शकते सोने; केंद्र सरकारच्या काय मेगा प्लॅन?
सोने आणि चांदी होणार स्वस्त
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 3:07 PM

गेल्या दहा वर्षांत सोने आणि चांदीच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. दोन्ही धातूंनी अफाट दौडघौड केली आहे. त्यामुळे महिलावर्ग नाराज आहे. काही दिवसानंतर मौल्यवान धातू अवाक्या बाहेर जातील की काय अशी स्थिती सध्या आहेत. बेशकिंमती धातूंनी या दहा वर्षांत अचानक मोठी उसळी घेतल्याने सराफा बाजाराकडे वळणारी अनेक पावलं आता माघारी फिरली आहे. या पूर्ण अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरवाढीला लगाम लावू शकते. काय आहे सरकारचा मेगा प्लॅन?

आयात शुल्कात कपातीची शक्यता

आगामी बजेटमध्ये सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात 5 टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते. बाजारातील तज्ज्ञानुसार आणि वित्त मंत्रालयातील सूत्रांच्या आधारे नवभारत टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, सरकार या मौल्यवान धातूवरील आयात शुल्क 15 टक्क्यांपेक्षा कमी आणण्यावर गंभीरतेने विचार करत आहे. सरकारने 15 टक्क्यांमधील 5 टक्के आयात शुल्क कमी केले तरी हे शुल्क 10 टक्क्यांपर्यंत येईल. सोने आणि चांदीच्या किंमती कमी होतील.

हे सुद्धा वाचा

जीएसटी कमी करण्याची मागणी

बाजारात सोने आणि चांदी खरेदी करताना पक्के बिल घेतल्या जाते. त्यावेळी ग्राहकांना जीएसटी द्यावा लागतो. अनेक ग्राहक या जीएसटीला वैतागून कच्च्या बिलाची पण मागणी करतात. या बजेटमध्ये जीएसटीविषयी सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना जीएसटीत सवलत देण्याची मागणी करण्यात येते आहे.

असा होईल ग्राहकांना फायदा

NBT मधील वृत्तानुसार, आयात शुल्कात कपात केल्यास सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा फरक दिसेल. जर सरकार इंपोर्ट ड्यूटीत 5 टक्क्यांपर्यंत कपात करेल तर सोने 3000 रुपयांपर्यंत तर चांदी 3800 रुपयांपर्यंत स्वस्त होईल. चीनच्या केंद्रीय बँकेने सोने खरेदी करणे बंद केले आहे. तर जगातील अनेक बँकांनी पण सोने खरेदीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी जमिनीवर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 71,267 रुपये, 23 कॅरेट 70,982 रुपये, 22 कॅरेट सोने 65,281 रुपये झाले. 18 कॅरेट 53,450 रुपये, 14 कॅरेट सोने 41,691 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 86,944 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.