Budget 2024 : फेब्रुवारीऐवजी जुलै महिन्यात का सादर होत आहे पूर्ण बजेट? कारण तरी काय

Union Budget 2024 : केंद्र सरकारने या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये कोणतीही मोठी घोषणा केली नाही. त्यासाठी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्पाची वाट पाहण्यास सांगितले होते.

Budget 2024 : फेब्रुवारीऐवजी जुलै महिन्यात का सादर होत आहे पूर्ण बजेट? कारण तरी काय
अर्थसंकल्पाची अशी ही माहिती
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 5:27 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील, अशी आशा आहे. हे या आर्थिक वर्षातील 2024-25 मधील पूर्ण बजेट असेल. तर सीतारमण या सर्वाधिक वेळा बजेट सादर करणाऱ्या अर्थमंत्री होतील. त्यांच्या नावावर 7 अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम असेल. पण अनेकांना प्रश्न पडला आहे की, केंद्र सरकारने या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होते, मग हे पूर्ण बजेट आहे तरी काय? या दोघांमध्ये नेमकं अंतर काय?

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?

ज्या वर्षात लोकसभा निवडणूक नसते, अशा वर्षात सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. तर ज्या वर्षात निवडणूक असते, त्यावेळी अंतरिम अर्थसंकल्प सादर होतो. त्यात केंद्र सरकार प्रशासकीय, वित्तीय खर्चांना मान्यता मंजूरी देते. त्यात प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्चाची तरतूद करण्यात येते. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्वसाधारण अर्थसंकल्पात अनेक नवीन योजना, जुन्या योजना, सवलती, कर रचना यासंबंधीचे निर्णय घेण्यात येतात. हा अर्थसंकल्प यंदा जुलै महिन्यात सादर करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

वोट ऑन अकाऊंट काय असतं?

नवीन सरकार स्थापन होईपर्यंतच्या खर्चाची तरतूद अंतरिम बजेटमध्ये करण्यात येते. यामध्ये पैसा कुठून आणि कसा येणार तर पैसा कुठे आणि कसा खर्च होणार याचा ताळेबंद मांडण्यात येतो. एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्ष सुरु होत असल्याने नवीन सरकार स्थापन होईपर्यंतच्या खर्चाची तरतूद अंतरिम बजेटमध्ये करण्यात येते. वोट ऑन अकाऊंट हे अंतरिम बजेटचाच एक भाग असतो. त्यात खर्चाची आकडेमोड सादर करण्यात येते. ते विना अडथळा मंजूर होते. अंतरिम बजेटवर मात्र संसदेत चर्चा करण्यात येते.

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात केंद्रीय बजेट

एक आठवड्यापूर्वी संसदीय कार्यमंत्री किरण रिजुजू यांनी 18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राची माहिती दिली. त्यानुसार 24 जून रोजी हे सत्र सुरु झाले. आता हे सत्र 3 जुलैपर्यंत सुरु राहिल. यादरम्यान लोकसभेच्या सदस्यांना शपथ देण्यात आली. तर 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली. तर लोकसभेचे दुसरे सत्र 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान असेल. 22 जुलै रोजी निर्मला सीतारमण या पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.