Budget 2024 : निर्मला सीतारमण कोणत्या परंपरेला यंदा देतील छेद; बजेटमध्ये कोणता पाडतील नवीन पायंडा

Modi 3.0 Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री यंदा एक नवीन विक्रम नावावर कोरतील. सलग 7 व्या वेळी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री त्या असतील. त्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नवनवीन परंपरा आणत आहेत. तर जुने जाऊ द्या मरणालागुनी, असे गीत त्या पुन्हा आळवतील का?

Budget 2024 : निर्मला सीतारमण कोणत्या परंपरेला यंदा देतील छेद; बजेटमध्ये कोणता पाडतील नवीन पायंडा
कोणत्या परंपरेला छेद, कोणता नवीन पायंडा
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 5:29 PM

मोदी 3.0 चे पहिले बजेट आणि आर्थिक वर्ष 2024-25 चे पूर्ण बजेट पुढील महिन्याच्या अखेरीस सादर होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. हे बजेट सादर करत असतानाच त्या एक नवीन विक्रम स्वतःच्या नावे करणार आहेत. तर यंदा त्या कोणत्या परंपरेला छेद देतील आणि त्याऐवजी नवीन पायंडा पाडतील याकडे पण अनेक तज्ज्ञांचे लक्ष लागलेले आहे.

सातव्यांदा सादर करतील बजेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सातव्यांदा बजेट सादर करतील. यापूर्वी माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावे 6 बजेट सादर करण्याचा विक्रम आहे. देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी देसाई यांनी अनेकदा अर्थमंत्री म्हणून पदभार संभाळला आहे. यावेळी सीतारमण या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. देशातील पहिली पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणूनही त्यांच्या नावे विक्रम आहे.

हे सुद्धा वाचा

सीतारमण यांनी केला असा बदल

अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांच्या बजेट भाषणादरम्यानच्या साड्यांच्या रंगाची यापूर्वी चर्चा झाली. तर त्यांनी अनेक परंपरांना पण छेद दिला. काही नवीन पायंडे पाडले.

1. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2019 मध्ये पहिले बजेट सादर केले. त्यावेळी इंग्रजांच्या काळापासून वापरण्यात येणारी ब्रीफकेस बंद केली. त्याऐवेजी त्यांनी लालरंगाची चोपडी वापरली. त्याला वहिखाते पण म्हटल्या जाते.

2. कोरोना काळात, 2021 मध्ये त्यांनी देशाचे पहिले पेपरलेस बजेट सादर केले. त्या एक टॅबलेट घेऊन संसदेत पोहचल्या. त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचले. वहीखात्याऐवजी एका लाल रंगाच्या फोल्डरमध्ये टॅब आणला होता.

3. 2022 मध्ये पण त्यांनी नवीन पायंडा पाडला. देशात प्रत्येक वर्षी बजेट प्रत छापण्यापूर्वी हलवा खाऊन तोंड गोड करण्याची परंपरा आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता, त्यांनी या परंपरेला छेद दिला. त्याऐवजी त्यांनी अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना मिठाई वाटप केली. पण हलवा कार्यक्रम बंद करण्यात आलेला नाही.

4. गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांचे बजेट भाषण एकदम वेगळे ठरले. त्यांनी गेल्यावर्षी कर व्यवस्थेत अमुलाग्र बदल केला. त्यांनी नवीन कर प्रणाली लागू केली. तर उत्पन्न स्तराचा एक निश्चित संचाला, आयकर स्लॅबमध्ये मोठा बदल केला. त्यांनी ही नवीन कर प्रणाली डिफॉल्ट टॅक्स सिस्टिम म्हणून लागू केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.