Budget 2024 Explainer : कसे तयार होते देशाचे केंद्रीय बजेट; या गोष्टींशिवाय अर्थसंकल्पाला अर्थ तरी काय?

Modi 3.0 Union Budget : केंद्रीय अर्थसंकल्पात संपूर्ण वर्षाच्या खर्चाचा हिशोब असतो. पण तुम्हाला माहिती आहे का बजेट कसे तयार होते, त्यासाठी काय तयारी करण्यात येते, कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, ते ?

Budget 2024 Explainer : कसे तयार होते देशाचे केंद्रीय बजेट; या गोष्टींशिवाय अर्थसंकल्पाला अर्थ तरी काय?
बजेट कसे तयार होते?
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 2:44 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या जुलै महिन्याच्या तिसऱ्या हप्त्यात Modi 3.0 चे सर्वसाधारण बजेट सादर करतील. त्यांचे हे सलग सहावे बजेट आहे. त्या माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोडीत काढतील. एकूण सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्याच नावे आहे. त्यांनी एकूण 10 बजेट सादर केली आहेत. बजेट कसे तयार होते, त्यासाठी काय तयारी करण्यात येते, कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, तुम्हाला माहिती आहे का?

बजेट तयार करण्याची सुरुवात कशी होते?

देशाचे बजेट तयार करण्यासाठी सर्वात मोठा आधार असतो- सकल राष्ट्रीय उत्पन्न, GDP. देशातील उत्पादित वस्तू आणि सेवांची बाजारात किंमत ठरते. त्याआधारे राजकोषीय तोटा, सरकारचे उत्पन्न आणि खर्च याची माहिती समोर येते. बजेट तयार करण्याची प्रक्रिया एका दिवसात होत नाही. त्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी लागतो. सरकार विविध खात्यांकडून आकडे मागवते. त्याआधारे त्या विभागाला किती निधीची गरज आहे हे समोर येते. तर जनकल्याण योजना, सबसिडी आणि इतर सवलतींवरील खर्चाचा अंदाज घेण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

बजेट तयार करण्यात या तज्ज्ञांचा समावेश

केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अर्थमंत्र्‍यांच्या देखरेखीखाली करण्यात येते. त्यासाठी अर्थ सचिव, महसूल सचिव, खर्चासंबंदीचे सचिव यांची भूमिका महत्वाची ठरते. केंद्रीय अर्थमंत्री त्यांच्यासोबत सतत संपर्कात असतो. बैठकांचे सत्र होते. अर्थमंत्र्‍यांच्या चमूसोबत पंतप्रधान आणि नीती आयोगांचे पथक मदत करते.

अर्थसंकल्पात या गोष्टींना महत्व

सरकार अर्थसंकल्पात महसूल आणि खर्चाची संपूर्ण माहिती देते. जनकल्याण योजनांना देण्यात येणारा निधी, आयातीसाठीचा खर्च, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरचा खर्च, सैन्य दलासाठीचा निधी, सरकारी कार्यालयांवरील खर्च, कर्ज किती घेण्यात आले. कर्जावर किती व्याज देण्यात आले याची माहिती देण्यात येते.

महसुलात सरकारी कर आणि अप्रत्यक्ष कराचा स्त्रोत, त्यातून प्राप्त रक्कम यांची माहिती देण्यात येते. सरकार कर लावण्याव्यतिरिक्त सरकारी कंपन्यांकडून कमाई करते. सोबत बाँडमधून कमाई करते. सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करुन निधी उभारण्याचा प्रयत्न होतो.

महसूलापेक्षा खर्च अधिक झाला, तर सरकारला राजकोषीय तोटा होतो. अशा स्थितीत सरकार त्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करते. कर वाढविण्यात येतो. आता जीएसटीमुळे सरकारचे चांगले उत्पन्न वाढले आहे. नवनवीन उद्योग, सेवांना करातंर्गत आणण्याचे प्रयत्न करण्यात येतात.

बजेटविषयी काही खास बाबी

1.बजेट हा बौगेट या फ्रेंच भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ छोटी बॅग अस आहे. देशाचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी इस्ट इंडिया कंपनीने सादर केला होता.

2. भारताचा पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. 1900 दशकातील सादर बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा शब्द नव्हता.

3. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाले. भारताचे पहिले अर्थमंत्री षण्मानुखम चेट्टी यांनी तो सादर केला. या बजेटमध्ये 92.74 कोटी रुपये म्हणजे जवळपास 46 टक्के रक्कम संरक्षणासाठी देण्यात आली होती.

4. 1955 पर्यंत अर्थसंकल्प केवळ इंग्रजी भाषेतच छापल्या जात होता. त्यानंतर तो इंग्रजीसह हिंदी भाषेत छापण्यात येत आहे. आता गेल्या काही वर्षांपासून नागरिकांसाठी बजेट डिजिटल स्वरुपात समोर येत आहे.

5. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आर्थिक वर्ष 1970-71 मध्ये पहिल्यांदा बजेट सादर केले. त्या बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. निर्मला सीतारमण यांनी 2019 मध्ये बजेट सादर केले. त्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या.

6. माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावे 10 हून अधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड आहे. 2017 मध्ये पहिल्यांदा रेल्वे बजेट केंद्रीय बजेटमध्येच सामील करण्यात आले. बजेट सर्वात दीर्घ भाषण अरुण जेटली यांनी दिले आहे. 2014 मध्ये त्यांनी 2.5 तासांचे दीर्घ भाषण दिले.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.