BUDGET 2022 : यंदा हलवा नव्हे मिठाई; कोविड सावटामुळं परंपरेला ब्रेक, अधिकारी क्वारंटाईन!

यंदा पारंपारिक हलवा समारंभ (Halwa Ceremony) वाढत्या कोविड प्रकोपामुळे रद्द करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट कामाच्या ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले.

BUDGET 2022 : यंदा हलवा नव्हे मिठाई; कोविड सावटामुळं परंपरेला ब्रेक, अधिकारी क्वारंटाईन!
Budget-2022
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:06 PM

नवी दिल्ली : येत्या एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करतील. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळाती हा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले आहे. अर्थसंकल्प प्रक्रियेत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हलव्याऐवजी मिठाईचं वाटप करण्यात आलं आहे. यंदा पारंपारिक हलवा समारंभ (Halwa Ceremony) वाढत्या कोविड प्रकोपामुळे रद्द करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट कामाच्या ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काही दिवस अगोदर दरवर्षी हलवा समारंभाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाईन केले जाते. अर्थ मंत्रालयाच्या तळघरात केवळ अर्थसंकल्प छपाईचे काम पार पडते.

अर्थसंकल्पाची गोपनीयता

अर्थसंकल्प  निर्मितीची विशिष्ट प्रक्रिया आहे. अर्थ मंत्रालयाची मुख्य इमारत नॉर्थ ब्लॉक मध्ये अर्थसंकल्प निर्मितीवेळी इतरांना नो एन्ट्री असते. अर्थ विभागातील अधिकाऱ्यांना गोपनीयता बाळगण्याच्या सूचना असतात. इतकंच नव्हे तर बजेटच्या आठवडभर आधी सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध असतात. अर्थसंकल्पाची प्रत मांडण्यापूर्वी मर्यादित अर्थतज्ज्ञ, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच अर्थवर्तुळातील पत्रकार यांना सोपविली जाते. मात्र, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी त्यामधील माहिती सार्वजनिक करता येत नाही. तसा अलिखित प्रघातच आहे.

छपाई गुप्तता ते अधिकारी क्वारंटाईन

वर्ष 1980 पासून अर्थसंकल्पाची छपाई नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात केली जाते. अर्थसंकल्पपूर्व तयारीचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हलवा समारंभ असतो. या कार्यक्रमानंतर अर्थसंकल्प संबंधित अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाईन केले जाते. अर्थ मंत्रालयाच्या तळघरात केवळ अर्थसंकल्प छपाईचे चालते.

ग्रीन बजेट

यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल (Digital Budget) असण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प पटलावर मांडण्यापूर्वी सदस्यांना वितरित करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्या जातात. अर्थसंकल्पाच्या मोजक्या प्रतींची प्रत्यक्ष छपाई केली जाईल. कागदाचा अधिकाधिक वापर टाळून हरित अर्थसंकल्पाची कल्पना पुढे आणली गेली आहे.

तारीख आणि वेळ

केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. ‘फर्स्टपोस्ट’च्या वृत्तानुसार, अर्थसंकल्पीय भाषण अंदाजे 1.30 तास ते 2 तासांदरम्यान असू शकते. दरम्यान, भाषण वाचनाचा कालावधीला अधिकही असू शकतो. वर्ष 2020 मधील 2 तास 40 मिनिटांपर्यंतचे अर्थसंकल्पीय भाषण आजवरचे सर्वाधिक अवधीचे भाषण ठरले होते.

संबंधित बातम्या

Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा, कृषी कर्जाच्या रकमेत होऊ शकते 18 लाख कोटीपर्यंतची वाढ

Home Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.