Shivsena Sanjay Raut reaction on Budget 2021| पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन लोकांना मारायचं आहे, संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

पेट्रोल डिझेलवर अधिभार लावून पेट्रोल 1000 रुपये लिटर करुन सर्वसामान्यांना सरकारला मारायचं असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. (sanjay raut Budget 2021)

Shivsena Sanjay Raut reaction on Budget 2021| पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन लोकांना मारायचं आहे, संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल
संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 2:33 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी पेट्रोल डिझेलवर लावलेल्या कृषी अधिभारावर सडकून टीका केलीय. पेट्रोल डिझेलवर अधिभार लावून पेट्रोल 1000 रुपये लिटर करुन सर्वसामान्यांना सरकारला मारायचं असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच,  केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे परिणाम आगामी 6 महिन्यांत कळतीलच. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी स्थिती केंद्र सरकारची झाली आहे, असेही राऊत म्हणाले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.  (government wants to kill the common man by imposing charges on petrol and diesel said sanjay raut)

मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज ( 1 फेब्रवारी) मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधीभार लावला आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच कारणामुळे राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे, अशी टीका राऊत यांनी केलीये. तसेच आगामी काळात काही राज्यांत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने आर्थिक तरतूद केली असेल, तर हा अर्थसंकल्प देशाचा नसून तो एका पक्षाचा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, असा घणाघात राऊत यांनी केला.

अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधतोय

यावेळी केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी केलेल्या तरतुदीवरुन राऊत यांनी सरकारला घेरलं आहे. त्यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रसाठी काहीही नाही, अस म्हणत या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला शोधण्याचा प्रयत्न करतो अशी खोचक टीका केलीये. तसेच सामान्य माणसाला पोटाची आणि भुकेची भाषा कळते. तरुणांना रोजगाराची भाषा कळते. यांच्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद केलेली आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.

संबधित बातम्या :

Union Budget 2021 Marathi LIVE : बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नाही, अर्थसंकल्पात थापा मारणं बंद करावं: संजय राऊत

Budget 2021 | Income Tax | टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाही, ज्येष्ठ नागरिकांना आयकरमध्ये सूट

Budget 2021 मध्ये खातेधारकांसाठी Good News, बँक बुडाली तर मिळणार 5 लाख रुपये

(government wants to kill the common man by imposing charges on petrol and diesel said sanjay raut)

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.