Share market Budget 2021: सेन्सेक्समध्ये 2000 पॉईंटसची उसळी; मार्केट कॅप 6 लाख कोटींनी वाढली

मुंबई शेअर बाजारात आज एकूण 3,129 कंपन्यांच्या समभागांचे व्यवहार झाले. यापैकी 1,946 समभागांचे भाव वधारले होते. | Share market budget 2021

Share market Budget 2021: सेन्सेक्समध्ये 2000 पॉईंटसची उसळी; मार्केट कॅप 6 लाख कोटींनी वाढली
भांडवली बाजार
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 4:23 PM

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प (Union budget 2021) मांडल्यानंतर भांडवली बाजारात आनंदाला उधाण आले आहे. त्यामुळे सेन्सेक्सने जवळपास 2000 अंकाची उसळी घेतली आहे. तर निफ्टीही 646 अंकांनी वधारला. बाजार बंद झाला त्यावेळी सेन्सेक्स 48600.61 च्या पातळीवर होता. तर निफ्टी 14281.20 च्या स्तरापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत सहा लाख कोटींची भर पडली. आता बाजारात मंगळवारीही असेच सकारात्मक वातावरण राहिले तर निफ्टी विक्रमी टप्पा ओलांडू शकतो.  (Dalal Street cheers Budget 2021 as Sensex surges 2,315 points, Nifty settles at 14,281)

बाजाराची स्थिती नेमकी काय?

मुंबई शेअर बाजारात आज एकूण 3,129 कंपन्यांच्या समभागांचे व्यवहार झाले. यापैकी 1,946 समभागांचे भाव वधारले होते. 203 समभागांच्या किंमतीत फरक पडला नाही. तर 980 कंपन्यांच्या समभागांचा भाव घसरला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 7 पैशांनी खाली घसरला.

यापूर्वीच्या 10 बजेटच्या घोषणेनंतर काय झाले होते?

* 26 फेब्रुवारी 2010 रोजी सेंसेक्स 175 अंकांनी पडला होता. * 28 फेब्रुवारी 2011 रोजी सेंसेक्स 123 अंकांनी वधारला होता. * 16 मार्च 2012 रोजी सेंसेक्स 220 अंकांनी पडला होता. * 28 फेब्रुवारी 2013 रोजी सेंसेक्स 291 अंकांनी पडला होता. * 10 जुलै 2014 रोजी सेंसेक्स 72 अंकांनी पडला होता. * 28 फेब्रुवारी 2015 रोजी सेंसेक्स 141 अंकांनी वधारला होता. * 29 फेब्रुवारी 2016 रोजी सेंसेक्स 52 अंकांनी पडला होता. * 01 फेब्रुवारी 2017 रोजी सेंसेक्स 476 अंकांनी वधारला होता. * 01 फेब्रुवारी 2018 रोजी सेंसेक्स 59 अंकांनी पडला होता. * 05 जुलै 2019 रोजी सेंसेक्स 395 अंकांनी पडला होता. * 01 फेब्रुवारी 2020 रोजी 900 अंकांनी पडला होता.

या शेअर्सवर लक्ष ठेवा

सॅमको सिक्युरिटीजच्या सिनिअर एनालिस्ट निराली शाह यांच्या म्हणण्यानुसार, लार्सन अँड टुब्रो, गेल, एनटीपीसी, इंडियन ऑईल, पीएनसी इन्फ्राटेक, हुडको, डालमिया इंडिया हे शेअर्स भांडवली बाजाराला नव्या उंचीवर नेऊन ठेवू शकतात.

या शेअर्सचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल फायदा

अर्थसंकल्पात सरकारच्या घोषणांचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेविषयीच्या एफएमसीजी, कृषी आणि संबंधित क्षेत्रांना होण्याची शक्यता आहे. कोरोमंडल इंटरनेशनल, रॅलिस इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, डाबर इंडिया, इमामी, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्सला मोठा फायदा होऊ शकेल.

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

मोठी बातमी! मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार

(Dalal Street cheers Budget 2021 as Sensex surges 2,315 points, Nifty settles at 14,281)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.