Share Market Budget 2024 : बजेटपूर्वीच शेअर बाजाराचा झुंबा डान्स; Stock मार्केटने अशी घेतली उसळी

Budget 2024 : मोदी 3.0 बजेट अवघ्या काही मिनिटात सादर होईल. त्यापूर्वीच शेअर बाजाराने तेजीची सलामी दिली आहे. बाजाराने उसळी घेतली आहे. त्यामुळे बाजाराला शेअर बाजाराकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर मोठ्या घोषणा होण्याचे संकेत मिळत असल्याचे दिसून येते.

Share Market Budget 2024 : बजेटपूर्वीच शेअर बाजाराचा झुंबा डान्स; Stock मार्केटने अशी घेतली उसळी
Budget 2024 Share Market
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 10:31 AM

मोदी 3.0 अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होईल. निर्मला सीतारमण बजेट सादर करतील. शेअर बाजाराने त्यापूर्वीच सकाळच्या सत्रात आघाडी घेतली आहे. बाजार पूर्व सत्रात आशादायक चित्र दिसले. विकासाच्या मोठ्या घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने बाजाराने सुरुवातीलाच घोडे दामटले. राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी आणि मुंबई शेअर बाजार सेन्सेक्सने सुरुवातीलाच घौडदौड केली. आता बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

आज मोठी उलाढाल

थोड्याच वेळात निर्मला सीतारमण बजेट सादर करतील. आज शेअर बाजारात चढउताराचे सत्र दिसू शकते. बीएसईचे मार्केट कॅप काल किंचित कमी झाले. बीएसईचे मार्केट कॅप 447.97 लाख कोटी रुपयांवर आले होते. त्यापूर्वी भांडवल हे 448 लाख कोटी रुपये होते. 30 शेअरच्या सेन्सेक्समधील 15 शेअर तेजीत तर 15 शेअर घसरणीवर होते. एनटीपी टॉप गेनर शेअर ठरला. तर एचसीएल टेक पिछाडीवर पडला.

हे सुद्धा वाचा

बजेटपूर्वी निफ्टी ऑईल अँड गँस, कंझ्युमर ड्युराबेल्स, हेल्थ केअर, फार्मा, मेटल, आयटी, आर्थिक क्षेत्राने लाल निशाणीवर कारभार सुरु केला. तर बँक निफ्टीमध्ये किंचित तेजी दिसली. निफ्टी हिरव्या निशाणीवर कारभार करत आहे. तर एफएमसीजी इंडेक्स आघाडीवर आहे. रिअल्टी इंडेक्स पण आगेकूच करत आहे.

येथे पाहा बजेटच्या ताज्या अपडेट्स

सकाळच्या सत्रात बहर

सकाळच्या पूर्व सत्रात सेन्सेक्सचे 25 स्टॉक्सने आघाडी घेतली होती. इंडसइंड बँक, पावर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि सन फार्मामध्ये घसरण दिसून आली. निफ्टीच्या टॉप गेनरमध्ये अल्ट्राटेक, एचडीएफसी लाईफ, आयसर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह आणि ग्रासिम हे स्टॉक होते. बजेट भाषण सुरु होण्यापूर्वी शेअर बाजाराने सकाळीच दमदार सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स 222 अंकांनी झेपावला. तो 80,724 अंकावर उघडला. तर निफ्टी 50 ने 59 अंकांची वाढ नोंदवली, निफ्टी 24,568 अंकांच्या स्तरावर उघडला.

सध्या काय स्थिती

सकाळच्या सत्रात दमदार कामगिरी दाखविणाऱ्या बीएसई सेन्सेक्सेने त्यानंतर 138 अंकांची घसरण नोंदवली. सेन्सेक्स 80,371 अंकांच्या जवळपास ट्रेड करत आहे. तर दुसरीकडे निफ्टी 50 मध्ये 64 अंकांची घसरण झाली. निफ्टी 24,446 अंकांवर ट्रेड करताना दिसून आला. आज दिवसभरात शेअर बाजार चढउताराच्या हिंदोळ्यावर असेल. घोषणा आणि विकासाच्या मुद्यावर बाजार प्रतिक्रिया नोंदवेल.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.