Budget 2021 |अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योग जगतात मोठ्या घडामोडी, ‘या’ 130 कंपन्या तिमाही निकाल सादर करणार

अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर देशातील अनेक नामवंत कंपन्या आपल्या तिमाहीचा निकाल सादर करणार आहेत. (quarterly result budget 2021)

Budget  2021 |अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योग जगतात मोठ्या घडामोडी, 'या' 130 कंपन्या तिमाही निकाल सादर करणार
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 7:51 AM

मुंबई : आगामी अर्थसंकल्पाला समोर ठेवून देशातील उद्योग जगताने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प (budget2021) सादर होणार असल्यामुळे सर्व कंपन्यांनी तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर देशातील अनेक नामवंत कंपन्या आपल्या तिमाहीचा निकाल सादर करणार आहेत. यामध्ये टाटा मोटर्स, इंडियन ऑईल, महिंद्रा अशा बड्या कंपन्याचा समावेश आहे. (total 130 companies goinge to declare their quarterly result before the 2021 economic budget)

आगामी अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार आहे. त्याआधी शुक्रवार (29 जानेवारी) आणि शनिवारी (30 जानेवारी) एकूण 130 कंपन्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. 91 कंपन्या शुक्रवारी भांडवली बाजार बंद झाल्यानंतर तिमाहीचा निकाल सादर करणार आहेत. टाटा मोटर्स, इंडियन ऑईल, महिंद्रा अशा कंपन्यांचा त्यात समावेश असेल. एवढ्या मोठ्या संख्येने कंपन्या आपला तिमाहीचा निकाल देणार असल्यामुळे सोमवारच्या भांडवली बाजारावर त्याचा परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे.

शुक्रवारी या कंपन्यांकडे सर्वांचे लक्ष

चालू सत्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भांडवली बाजार बंद झाल्यानंतर अनेक गोष्टी घडणार आहेत. अनेक मोठ्या कंपन्या त्यांचे तिमाहीचे निकाल सादर करणार आहेत. या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, इंडियन ऑईल, टेक महिंद्रा, डॉ. लाल पॅथ लॅब, सन फॉर्मा, एक्साईड इंडस्ट्री अशा बड्या कंपन्यांचा त्यात समावेश असेल.

शनिवारी या कंपन्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार

शुक्रवार आणि शनिवारी अशा दोन दिवशी एकूण 130 कंपन्या आपल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. या निकालामुळे भांडवली बाजार तसेच कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढउतार बघायला मिळतील असे म्हटले जात आहे. शनिवारी आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक, श्रीराम सीमेंट अशा बड्या कंपन्या आपले निकाल जाहीर करतील. म्हणजेच अर्थसंकल्प सादर होण्याच्या ठीक दोन दिवस आधी एकूण 19 कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. तिमाही निकाल सादर करण्यासाठी निश्चित अशी वेळ नसते. कंपन्या आपल्या सोईनुसार ते जाहीर करु शकतात. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कंपनीच्या भांडवलामध्ये परिणाम होऊ नये म्हणून अर्थसंकल्प सादर होण्याआधी निकाल जाहीर करण्याकडे कंपन्यांचा कल असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान अर्थसंकल्प सादर होण्यास थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. यावेळच्या अर्थसंकल्पाकडे भांडवली बाजार आणि उद्योग जगताचे विशेष लक्ष आहे. कोरोनाकाळात बसलेल्या फटक्यांनतर उद्योगांना दिलासा मिळेल अशा घोषणा यावेळी केल्या जातील अशी आशा उद्योजकांना आहे.

संबंधित बातम्या :

फेब्रुवारी 1 पासून व्यवहारातील या 5 गोष्टी बदलणार, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

आता गॅस सिलिंडर मोफत मिळणार, जाणून घ्या पेटीएमची नवी ऑफर

(total 130 companies goinge to declare their quarterly result before the 2021 economic budget)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.