नवी दिल्ली : देशाचा अर्थमहोत्सव उद्या बघता येईल. देशाची आर्थिक नाडी भारतालाच नाही तर जगाला कळणार आहे. भारताची घोडदौड आणि भविष्यातील घडामोड याची वित्तंबातमी तुम्हाला मिळेल. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. सीतारमण यांच्या कार्यकाळातील हा पाचवा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात देशात डिजिटल बजेटची परंपरा सुरु झाली. यंदा ही डिजिटल बजेट असेल. पेपरलेस बजेटवर यंदा भर देण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण तुम्हाला लाईव्ह बघता येईल. संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच पत्र सूचना कार्यालय(PIB) बजेट 2023 चे लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करेल.
टीव्ही9 मराठीसह इतर वृत्त वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. युट्यूबवरही तुम्हाला बजेट 2023 चे लाईव्ह प्रक्षेपण बघता येईल. विविध सरकारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, फेसबूक, ट्विटर आणि युट्यूबवर बजेटचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
तुम्ही Union Budget Mobile App वर अर्थसंकल्पाविषयीचे सर्व कागदपत्रे पाहु शकता. हे अॅप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे. या दोन्ही भाषेत बजेटसंबंधीचा सर्व तपशील तुम्हाला पाहता येईल. हा तपशील तुम्हाला डाऊनलोड करता येईल. त्याआधारे निवांत वाचन करता येईल.
हे अॅप अँड्राईड आणि आईओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अॅप तुम्हाला www.indiabudget.gov.in वर जाऊन डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला बजेटची इत्यंभूत माहिती मिळेल. तुम्ही ही माहिती जतन करु शकता. ती वाचू शकतात.
केंद्र सरकार दरवर्षी संसदेत एक बजट सत्र (budget session) आयोजीत करते. या अर्थसंकल्पात देशाचा आर्थिक विकास आणि त्यासंबंधीच्या विविध निर्णयाची माहिती देण्यात येते. केंद्रीय अर्थमंत्रीच या बजेट सत्रातून पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करतात.
2021 मध्ये केंद्र सरकारने पहिल्यांदा पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी संसदेचे सदस्य, सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पाचा तपशील देण्यासाठी अॅप देण्यात आले होते. “Union Budget Mobile App” ची सुरुवात त्यावेळी करण्यात आली होती.
1 फेब्रुवारी, 2023 रोजी जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री त्यांचे भाषण पूर्ण करतील. तेव्हा अर्थसंकल्पाची इंत्यभूत माहिती, तपशील मोबाईल अॅपवर उपलब्ध होईल. हे मोबाईल अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे.
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा
Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम
Budget 2023 : बजेट 2023 च्या हायलाईटस