जगात कोणत्या देशात सर्वप्रथम अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली? भारतात कधी? वाचा झटपट!
इंदिरा गांधी या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला होत्या.
नवी दिल्लीः देशाच्या अर्थमंत्री (Finance minister) निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman) आज 01 फेब्रुवारी रोजी सलग पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करत आहेत. या बजेटमध्ये 2022-23 म्हणजेच एप्रिल 2022 ते मार्च 2023 साठीच्या नियोजनाचा लेखा-जोखा मांडला जाईल. कर सवलती कशा असतील, यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल. एवढ्या नियोजनपूर्वक अर्थसंकल्प मांडला जात असेल तर याची सुरुवात नेमकी कशी झाली असावी? भारतात पहिलं बजेट कधी मांडलं गेलं? जगातले सगळेच देश बजेट सादर करतात का? कोणत्या देशानं सर्वात आधी बजेट सादर केलं असावं? असे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. यासंबंधीची उत्तरं खालील प्रमाणे?
- बजेट हा बुल्गा या लॅटिन शब्दापासून तयार झालाय. त्याचा अर्थ चामड्याची थैली. म्हणजेच एखादं कंटेनर.
- जगात सर्वात पहिलं बजेट इंग्लंडमध्ये सादर झालं. 1760 मध्ये. राजकोषचे चान्सलर यांनी प्रत्येक वित्त वर्षाच्या सुरुवातीला संसदेत राष्ट्रीय बजेट मांडण्यास सुरुवात केली.
- भारतात 07 एप्रिल 1860 मध्ये सर्वात आधी बजेट सादर करण्यात आलं. स्कॉटिश अर्थ शास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राजनेता जेम्स विल्सन यांनी देशाचं पहिलं बजेट ब्रिटिश क्राउन यांच्यासमोर सादर केलं होतं.
- स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर1947 रोजी तत्कालीन अर्थमंत्री आर के शटमुखम शेट्टी यांच्याकडून सादर करण्यात आलं.
- बजेटचं भाषण किती मिनिटांचं असतं, हीसुद्धा नेहमी चर्चेत असलेली बाबा. सर्वात मोठं बजेटचं भाषण अर्थनमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे. त्यांनी फेब्रुवारी 2020 रोजी 2020-21 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी 2 तास 42 मिनिटांचं भाषण दिलं होतं.
- तर 1977 मध्ये अर्थमंत्री हिरुभाई मुलजीभाई पटेल यांनी 800 शब्दात देशाचा सर्वात लहान अर्थसंकल्प मांडला होता.
- सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी एकूण 10 वेळा बजेट सादर केलं.
- 1955 पर्यंत बजेट फक्त इंग्रजीत सादर केलं जात होतं. तर त्यानंतर काँग्रेस सरकारने बजेट पेपर्स हिंदी आणि इंग्रजीत प्रिंट करण्याचा निर्णय घेतला.
- कोरोना संकटानंतर 2021-22 मध्ये पहिल्यांदा बजेट पेपरलेस स्वरुपात सादर झालं.
- इंदिरा गांधी या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला होत्या.