AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2023 : बजेटमध्ये होऊ शकतात या मोठ्या घोषणा! शेतकऱ्यांपासून नोकरदार करतील का भांगडा

Union Budget 2023 : अवघ्या काही तासात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात खिसा कापल्या जाणार की मिळणार दिलासा ?

Union Budget 2023 : बजेटमध्ये होऊ शकतात या मोठ्या घोषणा! शेतकऱ्यांपासून नोकरदार करतील का भांगडा
दडलंय काय
| Updated on: Feb 01, 2023 | 12:07 PM
Share

नवी दिल्ली : अखेर अर्थसंकल्पाची (Union Budget 2023) प्रतिक्षा संपली. थोड्याच वेळात देशाच्या अर्थमंत्री (Finance Minister) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. या बजेटकडून सर्वच क्षेत्रातील लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर मोठे दडपण असेल. शेतकरी, उद्योजक, कामगार, गृहिणी आणि नोकरदार वर्गाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्र सरकार या बजेटमध्ये सरप्राईज गिफ्ट देईल, अशी प्रत्येक वर्गाला आशा वाटत आहे. अर्थखात्याच्या पेटऱ्यात काय दडंलय हे अवघ्या काही तासात समोर येईल. पण या 23 मुद्यांभोवती अर्थसंकल्प फिरणार आहे.

1 मोदी सरकारचे हे शेवटचे पूर्ण बजेट आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा करु शकते. पीएम किसान सम्मान निधी योजनेतंर्गत वार्षिक 6 ऐवजी 8 हजार रुपयांची घोषणा होऊ शकते. तीन हप्त्यांऐवजी चार हप्त्यात ही रक्कम मिळू शकते. प्रत्येक चार महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. देशातील जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

2 गेल्या 9 वर्षांपासून कर सवलतीच्या मर्यादेत कसलाही बदल करण्यात आलेला नाही. परंतु या अंतिम अर्थसंकल्पात ही मर्यादा वाढण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार वर्गाला 80सी अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीतही अधिक फायदा मिळण्याची शक्यता वाढली आहे.

3 सध्या आयकरातंर्गत गुंतवणूकदारांना 80सी नियमाचा दिलासा मिळतो. 80सी अंतर्गत गुंतवणूकदारांना 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर द्यावा लागत नाही. यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि विमा योजनांचा समावेश आहे. ही मर्यादा वाढल्यास पगारदारांना मोठा दिलासा मिळेल.

4 च्या कर रचनेत 2.5 लाख रुपयांपर्यंत कर आकारण्यात येत नाही. 2.5 लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के, पाच ते 7.5 लाखांपर्यंत 10 टक्के, 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंत 15 टक्के कर द्यावा लागतो.

करदात्यांना 10 लाख ते 12.5 लाख रुपयांच्या उत्पन्नानावर करदात्यांना 20 टक्के कर द्यावा लागतो. 12.5 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के, 15 लाखांपुढील उत्पन्नावर करदात्यांना 30 टक्के कर द्यावा लागतो.

5 या स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपये आहे. नोकरदार, पगारदार कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या एकूण उत्पनातील 50000 रुपयांची रक्कम बाजूला सारुन कर गणना करण्यात येते. त्याआधारे तुम्हाला कर सवलतीचा फायदा मिळतो.

समजा तुमचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे. तेव्हा तुम्हाला प्रमाणित वजावटीद्वारे 50,000 रुपयांची सवलत मिळते. त्यामुळे तुमची करपात्र कमाई 5 लाख 50 हजार रुपये होईल. कर लावताना याच रक्कमेची गणना होईल. याच रक्कमेवर कर लावण्यात येईल. तुमचे वेतन यापेक्षाही कमी असेल तर स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा मिळेल. या प्रमाणित वजावटीत वाढ होण्याची शक्यता आहे.

6 केंद्रीय अर्थमंत्री 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर दिलासा देऊ शकते. मुदत ठेवीवर कुठलाही कर आकारण्यात येणार नाही. एफडी कर मुक्त करण्यात येऊ शकते. पण याचा कालावधी मर्यादीत आहे. तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवरच ही सवलत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.

7 बजेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अलाऊन्स(HBA)मध्ये आगाऊ रक्कम 25 लाखांहून 30 लाख रुपये होऊ शकते. या रक्कमेवर सध्या 7.1 टक्के व्याज आकारण्यात येते. व्याजाचा दर वाढून 7.5 टक्के होऊ शकतो.

8 पाकिस्तान आणि चीनच्या वाढत्या कुरापती पाहता, या बजेटमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद होऊ शकतो. संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियाचा नारा दिल्या जाऊ शकतो. यंदा संरक्षणावरचा खर्च 15 टक्के वाढण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत संरक्षण क्षेत्रासंबंधीच्या सर्व कंपन्यांना प्रोत्साहन मिळू शकते. सध्या 5000 पेक्षा अधिक युनिट संरक्षण क्षेत्रात डीआरडीओसोबत जोडल्या गेले आहेत.

9 देशात रोजगार वाढीसाठी केंद्र सरकार विशेष लक्ष देईल. नवीन व्यावसायिकांसाठी आणि स्टार्टअपसाठी केंद्र सरकार कर्ज योजनांवर सवलत जाहीर करु शकते. सबसिडीचा फायदा त्यांना मिळू शकतो. पीएलई योजनेचा विस्तार होऊ शकतो. सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगात गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येऊ शकतो.

10 रेल्वेच्या आधुनिकीकरणाला बजेटमध्ये मोठे महत्व देण्यात येणार आहे, रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून वेगवान आणि आधुनिक जगाची कास धरली आहे. आता अनेक मार्गांचे विद्युतीकरण, ताज्या दमाच्या रेल्वे, हायटेक मॉड्यूल रेल्वे स्टेशन यावर भर देण्यात येत आहे.

बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा

अर्थसंकल्प 2023 लाईव्ह टीव्ही

Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम

Budget 2023 : बजेट 2023 च्या हायलाईटस

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.