मुंबई : लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitaraman) या अर्थसंकल्प सादर करीत आहेत. हा त्यांच्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2023) असल्यामुळे आतापर्यंत मोठ्या घोषणा करण्यात आल्याचं अनेक अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. देशातील सामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक घोषणा आत्तापर्यंत करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने (Union Budget 2023 Live) कशा पद्धतीने मदत केली, तसेच कोरोनाचे डोस कोणत्या योजनेतून लोकांना देण्यात आले हे सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे.