मुंबई – सध्या सर्वांच लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. उद्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 2023-24 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसेदत सादर करतील. सर्वसामान्य नोकरदारांच नेहमीच बजेटकडे लक्ष असतं. कर सवलतीपासून ते पायाभूत सेवा-सुविधांसंदर्भात घेतले जाणारे निर्णय, नोकरदारांसाठी महत्त्वाचे असतात. दरवर्षी मुंबईकरांच, बजेटमध्ये रेल्वे संदर्भात होणाऱ्या घोषणांकडे विशेष लक्ष असतं. कारण मुंबईत लोकल प्रवाशांची संख्या 75 लाखाच्या घरात आहे. दररोज मुंबईत 75 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. त्यामुळे लोकल सेवेसंदर्भात मुंबईकरांना बजेटकडून विशेष अपेक्षा असतात.
लोकल सेवेत मुंबईकरांना न्याय मिळेल?
मुंबईत कामावर जाण्याच्या, कार्यालय सुटण्याच्या तसच इतरवेळी सुद्धा लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. लोकल खच्चून भरलेल्य असतात. लोकलमध्ये उभं रहाण्यासाठी सुद्धा प्रवाशांना जागा मिळत नाही. खासकरुन कल्याण-डोंबवली, बोरिवली-विरार, मार्गावरील प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. बसायला आसन मिळत नाही. त्यामुळे लोकलची संख्या वाढवावी, अशी प्रवाशांची मुख्य मागणी आहे. लोकल प्रवास अधिक सुसह्य व्हावा, सध्याचे तिकीट आणि मासिक पासचे दर वाढू नयेत ही मुंबईकरांची मुख्य मागणी आहे. या मागणीची दखल घेतली जाते का? ते उद्या समजेल.
मुंबईत रेल्वे स्टेशन्सवरील स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा झाल्याच दिसतय. या स्वच्छागृहांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जातेय. त्यात आणखी सुधारणा व्हाव्यात. रेल्वे ब्रिज्स आणि प्लॅटफॉर्म वाढवावेत या मुंबईकरांच्या मागण्या आहेत.
मुंबईतून दोन वंदे भारत ट्रेन होणार सुरु ?
केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेल्वेसाठी 1.9 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा आहे. लोकलशिवाय मुंबईतून दोन वंदे भारत ट्रेन सुद्धा सुरु होऊ शकतात. सीएसएमटी ते शिर्डी, सोलापूर मार्गावर या दोन वंदे भारत ट्रेन्स सुरु होऊ शकतात.
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढणार?
लोकलशिवाय टॅक्स स्लॅबमध्ये करमुक्त उत्पनाची मर्यादा वाढवावी. जेणेकरुन हातात जास्त पैसा खेळता राहील. अधिक खरेदी करता येईल, अशा अपेक्षा मुंबईकरांनी बोलून दाखवल्या.