तुमच्याकडे असलेलं १० रुपयाचं नाणं खरं की खोटं? आरबीआयने दिली माहिती

बाजारामध्ये 14 डिझाईन्सची विविध प्रकारची 10 रुपयांची नाणी आली आहेत. त्यामुळे खरं नाणं कोणतं यात अनेक नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. नाणी बनवण्याचे काम भारत सरकारच्या टांकसाळीत केले जाते. सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी याबाबत अलर्ट जारी करत आहेत. असे असले तरी या गोंधळामुळे आजही बाजारात अनेक ठिकाणी 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत.

तुमच्याकडे असलेलं १० रुपयाचं नाणं खरं की खोटं? आरबीआयने दिली माहिती
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 2:01 PM

बाजारात बनावट नोटा छापल्या जात असून सामान्य माणसाची यात फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकार घडल्याचे आपण ऐकलेच असेल. अश्या बनावट नोटांचे व्यवहार बाजारामध्ये सहजरित्या केला जात आहे. मात्र या बाबतची घटना लक्षात घेता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी याबाबत अलर्ट जारी करत असतात. जेणे करून सामान्य माणसाची यात फसवणूक होणार नाही. अशामध्ये आता 10 रुपयांच्या नाण्याबाबत लोकांमध्ये खरं आहे की खोटं यामध्ये अनेकदा संभ्रम असतो. सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी याबाबत अलर्ट जारी करत आहेत. असे असले तरी या गोंधळामुळे आजही बाजारात अनेक ठिकाणी दुकानदार 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत. आज आपण जाणून घेऊया खरी आणि बनावट नाण्यांमध्ये काय फरक आहे आणि तुम्ही ते कसे ओळखू शकता.

खरे नाणे कसे ओळखावे?

माहितीनुसार आतापर्यंत बाजारामध्ये 14 डिझाईन्सची विविध प्रकारची 10 रुपयांची नाणी आली आहेत. तसेच ही सर्व १० रुपयांची नाणी चलनात आहेत. दरम्यान यातील कोणती खरी? कोणती खोटी? यावर नेहमीच वाद होत असतो. अनेकदा नाण्याच्या किती ओळी खऱ्या आहेत याबद्दल लोक संभ्रमात असतात. याबद्दल लोकांनी आपापले सिद्धांत बनवले आहेत. ते म्हणजे १० ओळी असलेले नाणे खरे आहे, तर १५ ओळी असलेले नाणे हे खोटं नाणं असल्याचा दावा केला जातो. अनेक लोकांचा असा समज आहे की ज्या नाण्यावर रुपयाचे चिन्ह आहे ते खरे आहे. १० रुपयांच्या नाण्याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. पण खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) यामागचे सत्य सांगितले आहे.

आरबीआयने दिली ही माहिती

आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ही नोट मिळेल. देशाच्या मध्यवर्ती बँकेने यापूर्वी अनेकदा हा संभ्रम दूर केला आहे. या नोटमध्ये आरबीआयने नाण्याच्या 14 प्रकारच्या डिझाइन्सबद्दल सांगितले आहे. ज्यात नाण्यांवर वेळोवेळी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये चित्रित केली जातात. खरं तर, लोकांमध्ये भिन्न धारणा आहेत, ज्यामुळे लोकं 10 रुपयांची नाणी घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बाजारात १० रुपयांची अनेक प्रकारची नाणी व्यवहारात वापरली जात आहेत. याशिवाय नाण्याबाबत तुमचा काही संभ्रम असेल तर आरबीआयने एक टोल फ्री नंबरही दिला आहे. ज्याच्याद्वारे तुम्ही संभ्रम दूर करू शकता.

त्यांच्या टोल फ्री नंबरवरून तुम्ही 10 रुपयांच्या नाण्याविषयी अधिक माहिती मिळवू शकता. यासोबतच जर कोणी १० रुपयाचं खरं नाणे घेण्यास नकार दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईदेखील केली जाऊ शकते, असेही आरबीआयने म्हटले आहे.

जाणून घ्या टोल फ्री नंबरवरून खरं नाणं कोणतं आहे.?

सर्वप्रथम तुम्हाला आरबीआयच्या टोल फ्री नंबर 1440 वर कॉल करावा लागेल. यानंतर तुमचा कॉल कट होईल आणि तुम्हाला दुसऱ्या नंबरवरून कॉल येईल. या कॉलमध्ये तुम्हाला 10 रुपयांच्या नाण्याची संपूर्ण माहिती दिली जाईल.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.