लंडनहून 100 टन सोने मायदेशी आणले तरी कसे? कसे राबविले ‘मिशन सोनेरी’, RBI मुळे महाराष्ट्रातील हे शहर झाले सोन्याचे धनी

RBI Mission Gold : देशातील केंद्रीय बँक, रिझर्व्ह बँकेने 100 टन सोने लंडनहून भारतात आणले. अजून इतकेच टन सोने भारतात आणण्यात येणार आहे. पण इतके टन सोने भारतात आणले कसे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे...

लंडनहून 100 टन सोने मायदेशी आणले तरी कसे? कसे राबविले 'मिशन सोनेरी', RBI मुळे महाराष्ट्रातील हे शहर झाले सोन्याचे धनी
कसे राबविले मिशन सोनेरी
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 9:12 AM

भारत, अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी सातत्याने सोन्याचा साठा वाढवत आहे. देशातील गोल्ड रिझर्व्हची देखरेख ठेवण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) करते. भारताकडे सध्या 800 टनांपेक्षा अधिक सोने आहे. यातील 300 टनाहून अधिकचे सोने देशात आहे. तर इतर सोने हे देशाबाहेर, इतर देशांच्या मध्यवर्ती बँकेकडे सुरक्षित आहे. भारताचे सोने हे ब्रिटन आणि अमेरिकेत ठेवण्यात आले आहे. त्यातील 100 टन सोने आता मायदेशी आणण्यात आले आहे. कसे आणले इतके सोने भारतात? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

मोठी सुरक्षा व्यवस्था

एका देशातून दुसऱ्या देशात 100 टन सोने हलविणे हे काही सोपे काम नव्हते. त्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था करणे गरजेचे होते. युक्रेन, इस्त्राईल या भागात युद्ध सुरु आहेत. तर इतर दहशतवादी संघटनांचे आव्हान पण होते. अमेरिकेन राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षेसारखीच व्यवस्था हे सोने भारतात आणण्यात आले. कसे राबविले मिशन सोनेरी?

हे सुद्धा वाचा

33 वर्षांपूर्वी भारतातून बाहेर गेले सोने

यापूर्वी 1991 मध्ये मोठ्या प्रमाणात सोने देशबाहेर पाठविण्यात आले होते. भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. त्यावेळी अर्थव्यवस्था मोठ्या संकटात होती. पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सरकार होते. भारताला 47 टन सोने, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे गहाण टाकावे लागले होते. त्यानंतर भारतात आर्थिक उदारीकरण झपाट्याने झाले.

कसे आले भारतात 100 टन सोने?

भारतच नाही तर जगातील अनेक देश त्यांचा सोन्याचा साठा लंडन वा इतर देशात ठेवतात. आता आरबीआयने धोरण बदलवले आहे. सोने भारतात आणण्यात येत आहे. 100 टन सोने परत आणणे सोपे काम नव्हते. 100 टन सोने म्हणजे जवळपास 10 मोठे ट्रक भरुन सोने. त्याचे बाजारातील मूल्य जवळपास 8.5 अब्ज डॉलर म्हणजे 709,22,08,75,000 रुपये होते.

C-17 Globemaster III ने दाखवली कमाल

भारतीय वायुसेनेच्या C-17 Globemaster III विमानांनी त्यांची कमाल दाखवली. हे भारताचे मोठे मालवाहक विमान आहे. ते एकावेळी 80 टन वजन वाहू शकते. 2 T-90 टँक वा 130 सैनिकांच्या वजनाइतके वजन ते सहज वाहून नेते. भारतीय वायुसेनेकडे असे 11 विमान आहेत. मोठ्या गोपनीय पद्धतीने आणि सुरक्षेत 100 टन सोने भारतात परत आणण्यात आले.

ही दोन शहरं सोन्याचे धनी

भारतीय रिझर्व्ह बँक देशातील सोने मुख्यतः मुंबई आणि नागपूर येथील तिजोरीत ठेवते. 100 टन सोने भारतात परत आणल्यानंतर याच तिजोरीत ठेवण्यात आले आहे. आता भारतात एकूण 408 टन सोन्याचा साठा झाला आहे. अजून इतके सोने भारतात आणण्यात येणार आहे. याशिवाय आरबीआय गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.