100 टन सोन्याची ‘घरवापसी’; गोऱ्या साहेबांच्या बँकेतून सोने आले मायदेशी, किती टन सोने आहे RBI कडे

RBI Gold : भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधील सेंट्रल बँकेतून 100 टन सोने परत बोलावले आहे. हे सोने देशात दाखल झाले आहे. उभरत्या आणि मजबूत अर्थव्यवस्थेमुळे हे पाऊल टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

100 टन सोन्याची 'घरवापसी'; गोऱ्या साहेबांच्या बँकेतून सोने आले मायदेशी, किती टन सोने आहे RBI कडे
सोने आले मायदेशी
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 9:57 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ब्रिटनच्या सेंट्रल बँकेकडून आपले 100 टन सोने परत आणले आहे. कित्येक वर्षांपासून हे सोने सेंट्रल बँक ऑफ ब्रिटेनमध्ये ठेवण्यात आलेले होते. भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचे हे प्रतिक मानण्यात येत आहे. एकेकाळी देशातील सोने इतर देशात ठेवल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण आता देश त्याचे सोने परत आणण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, अजून काही टन सोने भारतात आणण्यात येईल. हा आकडा पण 100 टन इतकाच असेल, असा दावा करण्यात येत आहे. भविष्यात आर्थिक स्थिरतेसाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे. यामुळे आरबीआयच्या तिजोरीतील सोन्याचा साठा वाढला आहे.

1991 नंतर पहिल्यांदा मोठे पाऊल

वर्ष 1991 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात देशात सोने आणण्यात आले आहे आणि ते आरबीआयच्या तिजोरीत ठेवण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात इतकेच सोने भारतात आणण्यात येणार आहे. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्च महिन्याच्या अखेरीस आरबीआयकडे 822.1 टन सोने होते. त्यातील 413.8 टन सोने परदेशात ठेवण्यात आले होते. आता हे सोने हळूहळू देशात आणण्यात येत आहे. जागतिक आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत सोने खरेदी करण्यात आरबीआय आघाडीवर आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 27.5 टन सोन्याची भर घातली.

हे सुद्धा वाचा

RBI का खरेदी करत आहे सोने?

जगातील अनेक केंद्रीय बँका बँक ऑफ इंग्लंडकडे अनेक वर्षांपासून सोने ठेवतात. भारत स्वातंत्र्यपूर्व काळापासून या बँककडे सोने ठेवत आला आहे. आरबीआयने काही वर्षांपासून सोने खरेदी सुरु केली आहे. तर कोण-कोणत्या देशातून सोने परत आणता येईल, याची समीक्षा करण्यात आली होती. परदेशातही आरबीआयच्या सोन्याचा साठा वाढला आहे. तर इतर बँकांचा पण साठा वाढत आहे. त्यामुळे त्यातील काही सोने देशात परत आणण्यात आले आहे. भविष्यातील परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थिती

सोने हा भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. देशातील प्रत्येक घरात सोने आहे. किडूकमिडूक का असेना सोने हा भारतीयांचा वीक पॉईंट आहे. 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था संभाळण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान चंद्र शेखर यांच्या सरकारला सोने गहाण ठेवावे लागले होते. पण 15 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आरबीआयने 200 टन सोने खरेदी केले होते. त्यानंतर ही सोन्याच्या खरेदीत खंड पडलेला नाही.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.