रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. (Russia-Ukraine crisis) रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका जसा जागतिक आर्थव्यवस्थेला बसला आहे. तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक फटका हा युक्रेनमधून भारतात परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या जवळपास सर्वच भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशात आणण्यात यश आले आहे. मात्र या विद्यार्थ्यांसमोर सध्या एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे शैक्षणिक कर्जाची परतफेड कशी करायची? जे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेले होते, त्यांनी आपल्या शिक्षणासाठी लाखो रुपये कर्ज घेतले आहे. मात्र शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागल्याने हे शैक्षणिक लोन (Education Loan) आता परत कसे फेडायचे असा प्रश्न या विद्यार्थांना पडला आहे. याबाबत सरकारच्या वतीने संसदेत माहिती देण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या एकूण 1319 विद्यार्थ्यांनी 121.6 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या विद्यार्थ्यांना 21 खासगी बँकांनी (BANK) कर्ज दिले आहे.
युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांवर एकूण 121.6 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या विद्यार्थ्यांना युद्धामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले आहे. या विद्यार्थ्यांकडे डिग्री नसल्यामुळे आता हे विद्यार्थी कर्ज कसे फेडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर बोलताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, सध्या आम्ही युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आढावा घेत आहोत. रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमध्ये परिस्थिती कधी सामान्य होणार याबाबत निश्चित सांगता येणार नाही. मात्र लवकरच याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊ. काँग्रेस खासदार रवनीत सिंह यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली.
याबाबत पुढे माहिती देताना केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीय नागरिक युक्रेनमध्ये आडकले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्राच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमंतर्गंत आतापर्यंत एकूण 22500 नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांना सरकारच्या वतीने शक्य तीतकी मदत पुरवण्यात येत असल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Russia Ukraine war : काय बोलता! युद्ध ठरलं वरदान, काही देशांची 8 वर्षांची मंदी संपली
मार्चच्या तिमाहीत देशात नऊ टक्क्यांनी वाढली घरांची विक्री, मुंबई-पुण्यात मात्र घट