IT Industry CEO : हो, धनकुबेरच! IT कंपन्यांच्या या सीईओंच्या पगाराचा आकडा माहिती आहे का?

IT Industry CEO : भारतीय आयटी कंपन्यांच्या सीईओंच्या पगारावर किती आकडे आहेत माहिती आहे का? हे सीईओ देशातील धनकुबेरांपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या वार्षिक वेतनाचा आकडा इतका आहे की तुमचे डोळे विस्फारतील.

IT Industry CEO : हो, धनकुबेरच! IT कंपन्यांच्या या सीईओंच्या पगाराचा आकडा माहिती आहे का?
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 7:55 PM

नवी दिल्ली : भारतीय आयटी इंडस्ट्रीजने (IT Industry) काही वर्षांतच मोठी उसळी घेतली आहे. दरवर्षी आयटी इंडस्ट्रीजचा व्यवसाय आणि नफा जोरदार वाढत आहे. 2020 मध्ये आयटी इंडस्ट्रीचा वाटा भारताचे एकूण सकल देशातंर्गत उत्पादनाच्या (GDP) 8 टक्के होता. या आयटी कंपनीच्या सीईओच्या वेतनाची चर्चा नेहमीच रंगते. या सीईओंच्या पगारांचा आकडा पाहुन आकडी आल्याशिवाय राहत नाही. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांच्या यादीत Tata Consultancy Services, Infosys , HCL आणि Wipro या कंपन्यांचा समावेश आहे. इतर ही अनेक कंपन्या आणि सेवा पुरवठादार आहे. या आयटी कंपन्यांचा कारभार पाहणे सोपे काम नाही. हे मोठे जबाबदारीचे काम आहे. कंपनीचा महसूल वाढविण्यापासून अनेक कामे सीईओंना करावे लागतात. अर्थात जबाबदारीनुसार त्यांचा पगार ही खूप मोठा आहे. हे सीईओ देशातील धनकुबेरांपेक्षा कमी नाहीत. त्यांची वार्षिक कमाई ऐकून तुम्हाला धक्का बसलाशिवाय राहणार नाही.

C Vijayakumar: एचसीएल टेक्नॉलॉजी एचसीएल कंपनीने नुकताच वार्षिक अहवाल जाहीर केला. त्यानुसार, गेल्यावर्षी कंपनीने त्यांचे सीईओ सी. विजयकुमार यांना 123 कोटी रुपयांचा पगार दिला आहे. या गलेलठ्ठ पगारामुळे ते भारतातील आयटी सेक्टरमध्ये सर्वाधिक पगार घेणारे भारतीय सीईओ झाले आहेत. वार्षिक अहवालानुसार, त्यांना मूळ पगारापोटी 2 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 15 कोटी रुपये आणि व्हेरिएबल पेमेंटच्या रुपाने मिळतात. विजय कुमार हे 1994 मध्ये एचसीएल परिवारात दाखल झाले होते.

Salil-Parekh: इंफोसिस भारताच्या आयटी सेक्टरमध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओमध्ये सलील पारेख तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इन्फोसिसच्या वार्षिक अहवालात त्यांच्या पगाराचा आकडा देण्यात आला आहे. त्यानुसार, 2022 मध्ये पारेख यांच्या पगारात 43 टक्क्यांची वाढ होऊन, त्यांचे वेतन 71.02 कोटी रुपये झाले. या आकड्यात आधी दिलेल्या RSU प्रतिबंधित युनिट्सच्या स्टॉकमधील रु. 52.33 कोटींचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी आयटी फर्मने त्यांचा पगार वाढवला होता. आता त्यांचा पगार 79.75 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

CP-Gurnani: टेक महिंद्रा 2012मध्ये टेक महिंद्राचे सीपी गुरुनानी यांनी गेल्या वर्षी 63.4 कोटी रुपये वेतन घेतले. टेक महिंद्राच्या वार्षिक रिपोटनुसार, त्यांच्या वेतनात, कंपनीचे स्टॉक आणि एका वर्षानंतरच्या नोकरीचे लाभ होते. 30 वर्षांपेक्षा जास्त करिअरमध्ये गुरुनानी यांनी एचसीएल, एचपी लिमिटेड आणि पॅरोट सिस्टम्स इंडिया लिमिटेड या कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

Rajesh-Gopinathan: टीसीएस TCS चे सीईओ राजेश गोपीनाथ यांना यावर्षी 25.75 कोटी रुपये वेतन मिळाले. गेल्या वर्षीपेक्षा हे वेतन 27 टक्के जास्त आहे. कंपनीच्या वार्षिक रिपोर्टमध्ये गोपीनाथन यांना वेतनाच्या रुपात 1.5 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांना फायदे आणि अनुषांगिक लाभाच्या रुपात 2.25 कोटी रुपये मिलाले आणि कमिशन प्रॉफिटमध्ये 22 कोटी रुपये मिळाले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.