Mutual Fund पेक्षा अधिक परतावा, Niftybees आहे काय? 280 रुपयांत गुंतवणुकीचा करा श्रीगणेशा
Investment Tips : NiftyBees एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. यामध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. विशेष बाब म्हणजे तुम्ही निफ्टी बीईएसला शेअरप्रमाणे खरेदी आणि विक्री करु शकता. म्युच्युअल फंडला हा एक पर्याय म्हणून पाहण्यात येतो. काय आहे. निफ्टीबीईएस?
शेअर बाजारात हजारो कंपन्यांचे शेअर सूचीबद्ध आहेत. अशात सर्व कंपन्यांचे शेअर खरेदी करणे कठीण आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदार हे निफ्टीतील टॉप 50 आणि 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. पण बाजारातील 50 बड्या कंपन्यांचे शेअर खरेदीसाठी जास्त पैसा लागतो. पण NiftyBees च्या मदतीने तुम्ही केवळ 280 रुपयांमध्ये या बड्या 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. बाजारातील अनेक तज्ज्ञ निफ्टी बीईएस हा म्युच्युअल फंडपेक्षा अधिक चांगला असल्याचा दावा करतात. कारण यामध्ये गुंतवणूक करणे सोपे असते. त्यात परतावा पण जोरदार मिळतो. निफ्टी50 इंडेक्स जसा वाढेल, तसा निफ्टीबीईएसचा भाव वाढतो. चला तर जाणून घेऊयात घरबसल्या NiftyBees मध्ये गुंतवणूक कशी कराल ते?
काय आहे NIFTYBeES?
भारतात एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) अंतर्गत Niftybees (बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम) आहे. या योजनेतंर्गत दीर्घकालीन फायद्यासाठी गुंतवणूक करण्यात येते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजध्ये कॅपिटल मार्केट सेगमेंट, शेअर आणि म्युच्युअल फंड युनिट्स मिळून निफ्टी बीईएस तयार होतो.
Nifty BeES चा फायदा काय?
ब्रोकरेज फर्म कोटक सिक्योरिटीजनुसार, निफ्टी बीईएसमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. डीमॅट खात्यानुसार शेअर बाजारात व्यापारी सत्रात केव्हा पण निफ्टी बीईएस खरेदी करता येतो. शेअर प्रमाणेच निफ्टी बीईएसची खरेदी आणि विक्री करण्यात येते. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे. शेअर बाजाराच्या दिवसभरातील ट्रेडिंगमध्ये तुम्ही कधी पण निफ्टी बीईएस खरेदी करु शकता अथवा त्याची विक्री करू शकता.
Nifty BeES चे रिटर्न
परतावा देण्यात पण Nifty BeES अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 5 वर्षांचा विचार करता Nifty BeES ने 137 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा रिटर्न गुंतवलेल्या रक्कमेपेक्षा दुप्पट आहे. कोरोना काळात मार्च 2020 मध्ये निफ्टी बीईएसची किंमत 91 रुपये होती. आता सध्या हा भाव 278 रुपये आहे.
निफ्टी-50 चे काही खास ईटीएफ
Nifty BeES Nifty 50 ETF Nifty ETF
विशेष सूचना : हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या. तुमच्या नुकसान अथवा फायद्याला टीव्ही9 मराठी जबाबदार नसेल.