या अब्जाधीशाच्या नावे अजून एक रेकॉर्ड, 27,00,08,13,55,000 रुपयांची कमाई एकाच दिवसात

जगातील सर्वात मोठा फॅशन ब्रँड LVMH चे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांनी कमाईचा नवीन रेकॉर्ड केला. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, त्यांची संपत्ती एका दिवसात 32.3 अब्ज डॉलर म्हणजे 27,00,08,13,55,000 रुपया वाढली. ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर झेपावले. आतापर्यंत या यादीत एलॉन मस्क यांचा दबदबा होता.

या अब्जाधीशाच्या नावे अजून एक रेकॉर्ड, 27,00,08,13,55,000 रुपयांची कमाई एकाच दिवसात
बर्नार्ड अरनॉल्ट यांचा एकाच दिवसांत कमाईचा रेकॉर्डImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 3:27 PM

जगातील सर्वात महागडा फॅशन ब्रँड LVMH चे चेअरमन आणि सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती, आता 32.3 अरब डॉलर म्हणजे 27,00,08,13,55,000 रुपयांवर पोहचली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत गेल्या महिन्यापासून मोठा उलटफेर सुरु आहे. आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर पकड असणारे एलॉन मस्क पिछाडीवर आहेत. या कामगिरीमुळे अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलरच्या घरात पोहचली आहे. आता त्यांच्यात आणि इतर श्रीमंतात मोठे अंतर पडले आहे. या यादीत ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे 202 अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

एलॉन मस्क यांचा मोडला रेकॉर्ड

फ्रान्सचे व्यावसायिक बर्नार्ड अरनॉल्ट यांनी एका दिवसात सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड केला. यापूर्वी हा विक्रम एलॉन मस्क यांच्या नावे होता. 9 मार्च 2021 रोजी मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात 25 अब्ज डॉलरची भर पडली होती. तर बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत एकाच दिवशी 32.3 अब्ज डॉलरची भर पडली. या वर्षात आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत 22.7 अब्ज डॉलरची तेजी आली आहे. यावर्षात सर्वाधिक पैसा कमाविण्यात मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आहेत. त्यांनी या वर्षात 52.7 अब्ज डॉलर गाठीशी बांधले आहेत.

हे सुद्धा वाचा

LVMH हा जागतिक ब्रँड

अरनॉल्ट यांचा फॅशन, सौंदर्यप्रसाधने, लक्झिरियस कपडे, आभुषणे, पर्स आणि इतर साहित्य तयार करण्याचा मोठा उद्योग, व्यवसाय आहे. LVMH Moët Hennessy या कंपनीचे ते सीईओ आहेत. अरनॉल्ट कुटुंबियांकडे LVMH मध्ये 47.5 टक्के हिस्सेदारी आहे. या लक्झिरी हाऊसकडे सध्या 70 हून अधिक ब्रँड आहेत. यामध्ये Louis Vuitton, Christian Dior, Fendi, Moët & Chandon, Hennessy, Sephora आणि Veuve Clicquot यांचा समावेश आहे. Christian Dior मध्ये बर्नार्ड यांची 96.5 टक्के वाटा आहे.

असा आहे प्रवास

बर्नार्ड अरनॉल्ट यांचा जन्म 5 मार्च 1949 रोजी फ्रान्समध्ये रुबेक्स येथे झाला. 1984 मध्ये त्यांनी लक्झरी गुड्स बाजारात पाऊल ठेवलं. त्यांनी सर्वात अगोदर एका टेक्सटाईल समूहाचे अधिग्रहण केले. त्यानंतर अनेक उलढालीनंतर एलवीएमएच (LVMH) हा ब्रँड खरेदी केला. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्यांनी अमेरिकन ज्वेलरी कंपनी Tiffany & Co 15.8 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती. या समूहाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....