आर्थिक मंदीमुळे मारुती सुझुकीमध्ये 3 हजार कर्मचाऱ्यांची कपात

मारुती सुझुकीने तब्बल 3 हजार कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केले नाहीत, अशी माहिती मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आरसी भार्गव यांनी मंगळवारी (27 ऑगस्ट) दिली.

आर्थिक मंदीमुळे मारुती सुझुकीमध्ये 3 हजार कर्मचाऱ्यांची कपात
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 9:18 AM

मुंबई : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) तब्बल 3 हजार कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू (Contract Renew) केले नाहीत, अशी माहिती मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आरसी भार्गव यांनी मंगळवारी (27 ऑगस्ट) दिली. मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे बऱ्याच कंपनीने आपली उत्पादने थांबवली आहेत.

“कारच्या किंमतीत टॅक्समुळे वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची खरेदी मंदावली आहे, असं कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर्स बैठकीत भार्गव यांनी सांगितले.

13 लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता

मंदीमुळे ऑटो कंपनींत आतापर्यंत 20 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जर असे सुरु राहिले तर 13 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. जुलैमध्ये सलग 9 व्या महिन्यात गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे कंपनींनी आपली उत्पादन थांबवली आहेत.

ऑटो इंडस्ट्रीतील मंदीचे कारण

देशात वेगाने उपभोगाच्या वस्तूंच्या मागणीत घट होत आहे. जुलैमध्ये वाहन उत्पादन 17 टक्क्यांनी घटला आहे. NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनेन्शिअल इन्स्टीट्यूशन स्वत: आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे ऑटो डीलर्स आणि खरेदी करणाऱ्यांना कर्ज देऊ शकत नाहीये. त्यामुळे डीलरशीप बंद होत आहे. GST मध्ये झालेली वाढ, नोटबंदीमुळेही ऑटो इंडस्ट्रीमध्ये  मंदी आली आहे.

दरम्यान, देशात आलेल्या मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीशिवाय इतर क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. पारलेजी , ब्रिटानीया यांनीही आपल्या कंपनीतून अनेक कर्माचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. मंदीमुळे आणखी नोकऱ्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.