Share Market : शेअर बाजारावर भीतीचे भूत! गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले, ही आहेत कारणे

Share Market : भीतीचे सावट पसरल्याने शेअर बाजाराचे पानीपत झाले. गेल्या दोन दिवसांपासून बाजाराची चाल मंदावली आहे. विक्रीचे सत्र तेजीत आहे. या कारणांचा एकूणच बाजारावर परिणाम झाला. गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले.

Share Market : शेअर बाजारावर भीतीचे भूत! गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले, ही आहेत कारणे
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 4:44 PM

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) सलग दुसऱ्या दिवशी विखुरला. आजचे जवळपास 600 अंक आणि कालचे 500 अंकांची मोट बांधली तर दोन दिवसांत निर्देशांक जवळपास 1100 अंकांनी घसरल्याचे दिसून येते. या घसरणीचे अनेक कारणे आणि परिणाम आहेत. त्याचा फटका गुंतवणूकदारांना (Investors) बसला. आजच्या उलथापालथमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे आतापर्यंत जवळपास 4 लाख कोटी रुपयांहून अधिक बुडाले. आज निर्देशांकात 632.45 अंकांच्या घसरणीसह 59,173.83 अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी (Nifty) 176.70 अंकांच्या घसरणीसह 17,412.90 अंकांवर बंद झाला. बाजारावर अनेक घडामोडींचा परिणाम होतो. पण गुंतवणूकदारांच्या मानगुटीवर भीतीचे भूत बसल्यावर बाजाराला इतर कोणतीच मात्रा लागू होत नाही.

आज बाजाराच्या घसरणीला अमेरिकेतील बँक जबाबदार मानण्यात येत आहे. अमेरिकन सिलिकन व्हॅली बँकेच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे जवळपास 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यासह इतर ही कारणांनी शेअर बाजाराला मागे ओढले. कोणती आहेत ही कारणे ते पाहुयात.

अमेरिकन बँक SVB या वित्ती समूहाचे शेअर आज 60 टक्के घसरले. ही बँक स्टार्टअप्सला अर्थसहाय्य करते. त्यामुळे या बँकेचे बाजारातील भांडवल 80 अब्ज डॉलरने कमी झाले. तसा हा भारतीय बाजारारासाठी महत्वाचा मुद्दा नव्हता. पण या पडझडीचा भारतासह, आशियातील आणि जगभरातील स्टॉक मार्केटवर परिणाम दिसून आला. या समूहाने जगभरातील स्टार्टअप्सला पैसा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन बँक SVB चा परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून आला. प्रत्येक बाजारात या मुद्याची चर्चा होती. भारतीय बाजारावरही त्याचा परिणाम दिसला. तर एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या शेअरने आज लय गमावली. या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली. सार्वजिनक बँकाचा निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरला.

गेल्या महिनाभरापासून अदानी समूहाचा मोठा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. मागील महिन्यातही अदानी समूहाच्या शेअर्सने बाजाराला घसरणीच्या दरीत ओढले होते. निफ्टीत आज अदानी इंटरप्राइजेज 4 टक्क्यांनी झोपला. अदानी समूहाच्या 10 पैकी 6 शेअर्सनी मान टाकली. GQG पार्टनर्सची गुंतवणूक आणि कर्जाची परतफेडीचा परिणाम दिसून आला. अदानी समूहाचे शेअरमधील तेजी मंदावली.

अमेरिकेची केंद्रीय बँक अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या भीतीनेही बाजारावर परिणाम केला. केंद्रीय बँक मंदी आणि महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदरात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. बँकेच्या अध्यक्षांनी मंगळवारीच याविषयीचे संकेत दिल्याने अमेरिकन बाजारात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम आता जागातील इतर शेअर बाजारांवर दिसून येत आहे. शुक्रवारी, आज अमेरिकेतील बेरोजागारीचा आकडा समोर येईल. त्याचा परिणामही दिसेल.

भारतीय बाजारावर जागतिक शेअर बाजारांचा परिणाम दिसून येत आहे. नॅस्डॅकमध्ये 2 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण दिसून आली. बेंचमार्क S&P 500 आणि डॉव 2 टक्क्यांनी घसरला. जपानचा निर्देशांक निक्केई 1.7 टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा हँगसेंग हा बाजार 2.6 टक्क्यांनी घसरला. भारतीय रुपयाची दमछाक सुरुच आहे. डॉलरच्या तुलनेत त्यात आज 8 पैशांची घसरण होऊन तो 82.14 वर आला. तर परदेशी पाहुण्यांनी, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्रीचे सत्र आरंभल्यानेही बाजार मागे खेचल्या गेला. आतापर्यंत एफआयआय यांनी 561.78 कोटी शेअर्सची विक्री केली.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...