Gold : काय सांगता? 4,00,000 किलो सोने केले खरेदी! कोणी केली ही चढाई..
Gold : 4,00,000 किलो सोन्याची खरेदी करण्यात आली आहे..पण कोण करतेय एवढी सोने खरेदी..
नवी दिल्ली : ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद आणि केंद्रीय बँकांनी (Central Bank) भरमसाठ खरेदी केल्याने सोने पुन्हा चकाकले आहे. जागतिक पातळीवर सोन्याची मागणी (Global Gold Demand) सध्या कोविड पूर्व स्थितीत पोहचली आहे. त्यामुळे सोन्याचे वेड कमी झाले नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
वर्ल्ड गोल्ड काऊंसिल(World Gold Council) नुसार, सप्टेंबर महिन्यात तिमाही सोन्याच्या मागणीत 28% टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याची मागणी 1,181 टन झाली आहे. यापूर्वी मागणीत गेली वर्षी, 2021 मध्ये 18% टक्के वृद्धी झाली होती.
जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा साठा करण्यास सुरुवात केल्याचे एकंदरीत चित्र आहे. या खरेदीतील मोठा तिमाही 400 टन हिस्सा तीन देशांचा आहे. त्यात तुर्की (Turkey), उझबेकिस्तान (Uzbekistan) आणि कतार (Qatar) या देशांचा समावेश आहे.
जागतिक सोने परिषदेच्या दाव्यानुसार, दरवर्षींच्या सरासरीनुसार, यंदा सोने खरेदी 673 टनापर्यंत पोहचली आहे. ही सोने खरेदी 1967 नंतर सर्वात मोठ्या वार्षिक सरासरीवर पोहचली आहे.
2018 मधील तिमाहीत 241 टन सोने खरेदी करण्यात आले होत. हा रेकॉर्ड यावर्षीच्या तिमाहीत तुटला आहे. यंदा जगातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदीत रेकॉर्ड केला आहे. बँकांनी या तिमाहीत 400 टन सोने खरेदी केली आहे.
आता तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) किती सोने खरेदी केले, याची उत्सुकता लागली असेल. तर आरबीआयनेही सोन्याची खरेदी केली आहे.ही खरेदी इतर देशांच्या मानाने कमी असली तरी सोन्यात गुंतवणूक केलेली आहे.
वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या मते, आरबीआयने जुलै महिन्यात 13 टन सोने खरेदी केले होते. त्यानंतर सोने खरेदी जास्त करण्यात आली नाही. आकड्यांनुसार, केंद्रीय बँकेने सप्टेंबर महिन्यात 4 टन सोने खरेदी केले. त्यामुळे आरबीआयचा सोन्याचा साठा 785 टन झाला आहे.