बँकेत विना दावा 42,270 कोटी पडून, तुम्ही दावा करणार की नाही? ही आहे सोपी पद्धत

Bank Unclaimed Rupees | तुम्हाला या वर्षाच्या शेवटी लखपती होण्याचा योग जुळून येत आहे. अर्थात ही काही राशीची भविष्यवाणी नाही. तर बँकेत जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीची रक्कम पडून असेल तर त्याद्वारे तुम्हाला लॉटरी लागणार आहे. वडिलोपार्जीत संपत्ती, ठेव बँकेत ठेवली असेल तर बँका ही रक्कम परत करत आहेत. कोणत्या आहेत या बँका, कशी मिळणार रक्कम परत?

बँकेत विना दावा 42,270 कोटी पडून, तुम्ही दावा करणार की नाही? ही आहे सोपी पद्धत
प्रतिकात्मक चित्रImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 11:08 AM

नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : देशातील बँकांमध्ये विना दावा मोठी रक्कम (Unclaimed Deposits) पडून आहे. या रक्कमेत सातत्याने वाढ होत आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने बँकेत काही ठेव ठेवली. काही रक्कम बचत खात्यात राहिली आणि खाते वापरात नसल्याने ही रक्कम तशीच पडून राहिली. आजोबा वा इतर व्यक्तींचे खाते असेल, त्याचा विसर पडला असेल आणि त्यात रक्कम असेल तर अशा विना दाव्याच्या रक्कमेवर तुम्हाला दावा सांगता येईल. सध्या एका वर्षात दावा न केलेल्या रक्कमेत 28% वाढ होऊन ती 42,270 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. पण अजून या रक्कमेवर दावेदारांनी दावा सांगितलेला नाही. या रक्कमेवर तुम्हाला कसा दावा सांगता येईल?

सरकारने दिली ही माहिती

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेमध्ये अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी माहिती दिली. त्यानुसार, बँकेत पडून असलेल्या विनादाव्याच्या रक्कमेत 28% पर्यंत वाढ झाली आहे. मार्च 2022 पर्यंत ही रक्कम 32,934 कोटी रुपये होती. मार्च 2023 पर्यंत ती वाढून 42,270 कोटी रुपये झाली. यापैकी सरकारी बँकांमध्ये 36,185 कोटी रुपये पडून आहेत. तर खासगी बँकांमध्ये 6087 कोटी रुपये पडून आहेत.

हे सुद्धा वाचा

विना दावा खात्याला वाली कोण?

अनेक जण घरी न सांगता, बँकेचे खाते उघडतात. त्यात काही रक्कम ठेव ठेवतात. काही वर्ष व्यवहार केल्यानंतर या खात्यात कोणताही व्यवहार होत नाही. देशात अशी अनेक खाते निष्क्रिय आहेत. या खात्यातील मोठ्या रक्कमा तशाच पडून आहेत. खातेदार हयात नसल्याने वा खात्याचा विसर पडल्याने त्यांनी या रक्कमेवर दावा सांगितलेला नाही. दहा वर्षांत या खात्यात रक्कम टाकण्यात आली नाही अथवा रक्कम काढण्यात आली नाही तर केंद्र सरकार त्याला अनक्लेम डिपॉझिट म्हणून जाहीर करते. पुरावा सादर केल्यास ही रक्कम परत मागण्याची सोय करण्यात आली आहे.

येथे मिळवा रक्कम परत

या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक केंद्रीय, मध्यवर्ती संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्याला उद्गम (UDGAM) म्हणजे Unclaimed Deposits – Gateway to Access information असे नाव देण्यात आले आहे. जर तुमच्याकडे अशा काही रक्कमेचा पुरावा असेल तर या वेबसाईटवर जाऊन, योग्य माहिती आणि त्यासंबंधीची कागदपत्रे जमा करुन सदर रक्कमेवर दावा करता येतो. पडताळणी नंतर तुमच्या दाव्यात तथ्य आढळल्यास रक्कम तुमच्या ताब्यात देण्यात येईल.

अशी आहे प्रक्रिया

https://udgam.rbi.org.in/ या संकेतस्थळावर जा

या ठिकाणी नाव नोंदणी करा.

मोबाईल क्रमांक आणि पासवर्डचा वापर करुन लॉगिन करा

रजिस्टर क्रमांकवर ओटीपी येईल.ओटीपी टाकून पुढील प्रक्रिया करा

पॅन क्रमांक, आधार क्रमांकाचा पुरावा द्या. जन्मतारीख नोंदवा

पुढील प्रक्रियेत अनक्लेम्ड रक्कमेची माहिती मिळेल

तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत सुद्धा संपर्क साधू शकता

या 30 बँकांमध्ये जमा आहे रक्कम

  • भारतीय स्टेट बँक (SBI)
  • पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank)
  • धनलक्ष्मी बँक लिमिटेड (Dhan Laxmi Bank)
  • साउथ इंडियन बँक लिमिटेड (South Indian Bank)
  • डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (DBS Bank)
  • सिटीबँक (Citi Bank)
  • कॅनरा बँक(Canara Bank)
  • बँक ऑफ इंडिया (Bank of India)
  • बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
  • इंडियन बँक (Indian Bank)
  • युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
  • एचडीएफसी बँक (HDFC Bank)
  • फेडरल बँक (Federal Bank)
  • कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
  • ICICI बँक (ICICI Bank)
  • यूको बँक (UCO Bank)
  • बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
  • IDBI बँक (IDBI Bank)
  • जम्मू आणि कश्मीर बँक (Jammu and Kashmir Bank Ltd.)
  • पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sindh Bank)
  • एक्सिस बँक (Axis Bank)
  • इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)
  • स्टँडर्ड चार्टर्ड बँक (Standard Chartered Bank)
  • HSBC बँक (HSBC Ltd.)
  • कर्नाटक बँक लिमिटेड (Karnataka Bank Ltd.)
  • करूर वैश्य बँक लिमिटेड (The Karur Vysya Bank Ltd)
  • सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank)
  • इंडसइंड बँक लिमिटेड (IndusInd Bank)
  • तमिळनाडू मर्केंटाइल बँक लिमिटेड (Tamil nadu Mercantile Bank)
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.