IPO येण्याआधीच संस्थापकाने कंपनी विकून 400 कर्मचाऱ्यांना रातोरात करोडपती केले,पण म्हणाला हा दिवस…
कोणतीही नवीन कंपनी काढायची म्हणजे अपार कष्ट आणि जिद्द लागते. अनेक वर्षांच्या मेहनतीने कंपनी नावारुपाला येत असते. परंतू एका 46 वर्षाच्या उद्योजकाने त्याची कंपनी नावारुपाला आल्यानंतर अचानक विकून टाकली. त्यामुळे त्या कंपनीच्या चारशे कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली. कारण त्यांनी कंपनीतील शेअर खरेदी केलेले असल्याने ते रातोरात करोडपती झाले. कोण आहेत हे उद्योजक पाहूयात...
46 वर्षीय उद्योजक ज्योती बंसल यांनी त्यांच्या सॉफ्टवेअर स्टार्टअप ऐपडायनामिक्स याला 3.7 अब्ज डॉलरला विकून टाकले, या डील मुळे त्यांचे चारशे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात नवीन पहाट झाले. रातोरात ते करोडपती झाले. या टेक कंपनीला विकण्याचा निर्णय मात्र आपल्या जीवनातील सर्वात दुखद दिवस होता असे त्यांनी म्हटले आहे. सॅन फ्रासिस्को स्थित सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक ज्योती बंसल यांनी ऐपडायनामिक्स कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीला नंतर साल 2017 मध्ये 3.7 अब्ज डॉलरला Cisco कंपनीला विकून टाकले होते. या कंपनीचा आयपीओ येणार होता. सॅनफ्रान्सिस्कोला राहणारे मूळचे भारतात जन्मलेले उद्योजक ज्योती बंसल कंपनीचे अध्यक्ष आणि सर्वात मोठे शेअरधारक होते. त्यांना आयपीओ आल्यानंतरही मोठा फायदा झाला असता. परंतू जेव्हा सिस्को कंपनीने या कंपनीला 3.7 अब्ज डॉलरला खरेदी करण्याची ऑफर दिली तेव्हा कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विचार करुन तिला विकण्याचा निर्णय घेतला. कारण कंपनीला या उंचीवर पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली होती.
काही कर्मचारी सहा महिन्याची रजा टाकून फिरायला गेले
सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ज्योती यांनी सांगितले की जेव्हा आपण कंपनी विकली तेव्हा ऐपडायनामिक्स साठी काम करणाऱ्या 400 कंपन्याच्या शेअरचे मूल्य 1 दशलक्ष डॉलरहून अधिक झाले. अनेक कर्मचाऱ्यांच्या जीवन बदलणाऱ्या या सौद्यामुळे त्यांना लगेच 5 दशलक्ष डॉलरहून अधिक रक्कम मिळाली. ते म्हणाले की या निर्णयाने कंपनीचे कर्मचारी खूश झाले.त्यांनी इतक्या पैशांची कधी कल्पनाच केलेली नव्हती. अनेकांनी नवीन घरे, कार विकत घेतल्या. एका व्यक्तीला मी ओळखतो त्याने तर सहा महिन्यांची रजा टाकली आणि आरव्ही भाड्याने घेतली देशभर प्रवासाला सुरुवात केली. अखेर त्यांना जे हवे होते ते करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आपल्या सामुहिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी सिस्को आणि ऐपडायनामिक्स दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना भव्य पार्टी दिली.परंतू या दिवसाला ते नेहमीच पश्चाताप आणि निराशेचा दिवस म्हणूनच पाहातात.
तो दिवस कधी दु:खदायक, निराशेचा
एका मुलाखतीत ज्योती बंसल म्हणतात की मी माझ्या जीवनातील नऊ वर्षे कंपनीसाठी समर्पित केली होती. आणि अचानक एक अध्याय संपला. कंपनीला विकण्याच्या निर्णयाने आपण दु:खी आणि व्यतिथ झालो होतो.मला नेहमीच वाटायचे की माझी कंपनी आणखी मोठी होऊ शकली असती आणि यशस्वी होऊ शकली असती. या डीलनंतर सात वर्षांनंतर त्यांनी आणखी दोन सॉफ्टवेअर स्टार्टअप्स ट्रेसेबल आणि टुडे हार्नेस तयार केले. त्यांची मार्केट व्हॅल्यू 3.7 अब्ज डॉलर आहे. ही तेवढीच रक्कम आहे. जेवढ्यात त्यांनी आपले पहिले स्टार्टअप्स विकले होते.