50 कोटींचा आलिशान बंगला, पायात 20 लाखांचे शूज, शार्क टँकची ही जज तरी कोण?

Shark Tank Judge | तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, शार्क टँक इंडियात अशी पण एक जज आहे जी 20 लाखांचे शूज वापरते. या गोष्टीचा खुलासा तिच्या सहकाऱ्याने या शोमध्ये केला होता. या जजकडे 50 कोटींचा बंगला आहे आणि कोट्यवधींच्या कारचे कलेक्शन पण आहे. घरातच गॅरेज पण आहे.

50 कोटींचा आलिशान बंगला, पायात 20 लाखांचे शूज, शार्क टँकची ही जज तरी कोण?
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 3:01 PM

नवी दिल्ली | 14 March 2024 : जर तुम्हाल विचारलं की तुम्ही किती महाग शूज वापरता तर, त्याचे उत्तर काय असेल? जास्तीत जास्त 10 हजार अथवा डोक्यावरुन पाणी 20 हजारांचे शूज. हो की नाही? पण प्रसिद्ध Shark Tank India मधील ही जज 20 लाखांचे शूज वापरते. शार्क टँक इंडिया या शोची चर्चा आहे. या शोमध्ये स्टार्टअप कंपनी नवनवीन कल्पना घेऊन येतात. शार्क डील मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करतात. शार्क टँकच्या जजेसमध्ये नमिता थापर नेहमी चर्चेत असते. तिची जीवनशैली एकदम आलिशान आहे. श्रीमंती जणू तिच्या पायाशी लोळण घेते. तिच्या सहकारी जजने ती 20 लाखांचे शूज वापरत असल्याचा दावा केला आहे. ती किती संपत्तीची मालकीण आहे?

20 लाखांचे शूज

नमिता ही यशस्वी उद्योजिका आहे. ती आंतरराष्ट्रीय कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडची संचालक आहे. याशिवाय ती इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडची संस्थापक आणि सीईओ पण आहे. नमिता या कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे आलिशान बंगले आणि महागड्या कार सुद्धा आहे. तिचा सहकारी या शोमधील जज अमित जैन यांनी ती 20 लाख रुपयांचे शूज वापरत असल्याचे सांगितले. नमिताकडे अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहे. तिच्याकडे 2 कोटी रुपयांची BMW X7, एक मर्सिडीज-बेंज GLE आणि ऑडी Q7 सारख्या महागड्या कार आहेत.

हे सुद्धा वाचा

50 कोटींचा बंगला

  • नमिताची एकूण संपत्ती जवळपास 600 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. ती पुण्यामध्ये तिच्या कुटुंबियांसह राहते. तिचे घर एकदम आलिशान आहे. नमिताचा हा टुमदार बंगला 5000 चौरस फुटावर पसरला आहे. त्याची आजची किंमत 50 कोटींच्या घरात आहे. शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये नमिता एका भागासाठी 8 लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
  • याशिवाय तिने या शोमध्ये आलेल्या जवळपास 25 कंपन्यांमध्ये 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये Bummer, Altor (स्मार्ट हेलमेट कंपनी), InACan (कॉकटेल कंपनी) आणि Wakao Foods (रेडी-टू-कुक फूड उत्पादक) यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यात तिने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नमिता थापर हिने विकास थापर याच्याशी लग्नगाठ बांधली. विकास हा एक उद्योगपती आहे. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. एकाचे नाव वीर थापर तर दुसऱ्याचे नाव जय थापर आहे.
Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.