Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Rushi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या पत्नीने गमावले एकाच दिवसांत 500 कोटी! काय आहे भारतीय कंपनीशी कनेक्शन

PM Rushi Sunak : द ग्रेट ब्रिटनेच पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीने एकाच दिवशी 500 कोटी रुपये गमावले आहेत. यामागे एका भारतीय कंपनीचे कनेक्शन आहे.

PM Rushi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या पत्नीने गमावले एकाच दिवसांत 500 कोटी! काय आहे भारतीय कंपनीशी कनेक्शन
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 8:28 PM

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rushi Sunak) यांची पत्नी अक्षता मूर्ती-सुनक(Akshata Murthy-Sunak) यांना एकाच दिवशी जवळपास 61 दशलक्ष डॉलरचा, भारतीय रुपयांत 500 कोटींचा फटका बसला. यामागे एका भारतीय कंपनीचे कनेक्शन आहे. या कंपनीला नुकसान झाल्याने त्याचा फटका पंतप्रधानांच्या पत्नीला सहन करावा लागला आहे. सध्या इंग्लंडमध्ये ऋषी सुनक यांना विरोधक घेरण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांच्या पत्नीकडे ब्रिटिश नागरिकत्व नाही. त्या स्थानिक नागरिक नसल्याने त्यांना इंग्लंडमधील कर अदा करण्याची गरज नाही. त्यामुळेच आता या मुद्यावरुन तिथलं वातावरण तापले आहे.

एकाच दिवसात मोठा फटका ब्रिटनच्या पंतप्रधानांची पत्नी अक्षता मूर्ती सुनक यांनी एकाच दिवशी 500 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामागे एका भारतीय कंपनीचे नाव पुढे येत आहे. अक्षता मूर्ती या नारायण मूर्ती आणि सुद्धा मूर्ती यांची मुलगी आहे. नारायण मूर्ती यांची इन्फोसिस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी सॉफ्टवेअर कंपनी आहे. सोमवारी इन्फोसिस कंपनीचे शेअर जवळपास 10% घसरले. त्यामुळे अक्षता यांना त्याचा फटका बसला. त्यांना एकाच दिवसात मोठे नुकसान सोसावे लागले.

फायदा नव्हे नुकसान मीडियातील रिपोर्ट्सनुसार, इन्फोसिसला जानेवारी ते मार्च या दरम्यान मोठ्या फायद्याची अपेक्षा होती. परंतु, बाजारातील परिस्थितीचा विपरीत परिणाम दिसून आला. नफ्याचे गणित तर मांडता नाही आले, पण कंपनीला मोठा फटका बसला. त्यामुळेच अक्षता यांना 500 कोटींपेक्षा अधिकचा फटका बसला. हे नुकसान केवळ 24 दिवसांतच झाले आहे.

हे सुद्धा वाचा

किती आहे वाटा अक्षताकडे इन्फोसिसचे 0.94% टक्के हिस्सा, वाटा आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे एकूण 3.89 कोटी शेअर आहे. सुनक कुटुंबियांना हे सर्वात मोठे नुकसान मानण्यात येत आहे. सध्या अक्षताकडे जवळपास 450 दशलक्ष पाऊंड, भारतीय रुपयात 4600 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.

अक्षता मूर्ती यांना इतका फायदा अक्षता मूर्ती सुनक यांची इन्फोसिसमध्ये जास्त हिस्सा, वाटा नाही. डिसेंबर तिमाहीमधील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अक्षता मूर्ती यांच्याकडे 31 डिसेंबर, 2022 पर्यंत 3,89,57,096 शेअर म्हणजे, 1.07 टक्के हिस्सेदारी आहे. लाभांश जाहीर झाल्यानंतर अक्षता मूर्तीला 68.17 कोटी रुपयांची कमाई झाली.

कुटुंबाला एकूण 264 कोटी रुपये मिळाले इन्फोसिसला या आर्थिक वर्षात ( FY23) अंतिम लाभांश जाहीर झाला. प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश देण्यात येणार आहे. त्यानुसार, नारायण मूर्ती, त्यांची पत्नी सुधा एन. मुर्ती, त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि मुलगी अक्षता मूर्ती सुनक यांना लाभांशातून एकूण 264.17 कोटी रुपयांची कमाई झाली.

'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.