Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pension | प्रत्येक महिल्याला मिळवा 5000 रुपये पेन्शन, रोज जमा करा 7 रुपये केवळ

Pension | अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला हमीपात्र पेन्शनच मिळत नाही तर इतर पण अनेक फायदे मिळतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचविता येतो. कराचा हा फायदा गुंतवणूकदारांना आयकर कलम 80C अंतर्गत मिळतो. काय आहे ही योजना, जाणून घ्या..

Pension | प्रत्येक महिल्याला मिळवा 5000 रुपये पेन्शन, रोज जमा करा 7 रुपये केवळ
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 10:06 AM

नवी दिल्ली | 14 February 2024 : पेन्शन, निवृत्ती हा शब्द आयुष्याची संध्याकाळ आनंदाने घालविण्यासाठी आधार ठरतो. निवृत्तीनंतर आर्थिक हातभार लावण्यासाठी पेन्शन उपयोगी ठरते. त्यामुळे आतापासून तुम्ही जर उतारवयासाठी योग्य आर्थिक तरतूद केली तर तुम्हाला आर्थिक खर्चाचा ताण येत नाही. मुलांवरील अवलंबित्व पण कमी होते. पेन्शन हे दरमहा उत्पन्नाचे साधन ठरते. जर तुम्ही तरुण असाल तर प्रत्येक महिन्याला एक छोटी रक्कम पेन्शन योजनेत गुंतवल्यास उतारवयात मोठा फायदा मिळतो. सरकारची अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana-APY) त्यामुळेच लोकप्रिय ठरली आहे.

5000 रुपयांपर्यंत हमखास पेन्शन

उतारवयात आर्थिक स्वांतत्र्य असेल तर त्यापेक्षा आनंदाची बातमी काय असेल, नाही का? त्यामुळेच अटल पेन्शन योजनेतील गुंतवणूक फायद्याचा सौदा ठरेल. या योजनेत केंद्र सरकार पेन्शनची हमी देते. या योजनेसाठी तुम्ही प्रत्येक दिवशी एक छोटी रक्कम बाजूला काढल्यास आणि योजनेनुसार गुंतवल्यास 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. म्हणजे निवृत्तीनंतर तुमचे नियमीत उत्पन्न पक्के आहे. APY मध्ये गुंतवणुकीसाठी 18 ते 40 अशी वयोमर्यादा आहे.

हे सुद्धा वाचा

20 वर्षे करावी लागेल गुंतवणूक

अटल पेन्शन योजनेत पेन्शन मिळविण्यासाठी कमीत कमी 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते. जर तुम्ही 40 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरु केली तर 60 व्या वर्षांपर्यंत तुम्हाला या योजनेत गुंतवणूक सुरु ठेवावी लागेल. APY मधील गुंतवणुकीवर हमखास पेन्शनच मिळते असे नाही तर इतर पण अनेक फायदे मिळतात. यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचविता येतो. कराचा हा फायदा गुंतवणूकदारांना आयकर कलम 80C अंतर्गत मिळतो. पण जे आयकर भरतात, अशा करदात्यांना या योजनेतून कराचा फायदा घेता येत नाही.

किती करावी लागते गुंतवणूक

  1. 18 व्या वर्षी 210 रुपये प्रति महिना गुंतवल्यास 60 व्या वर्षी 5,000 रुपये पेन्शन मिळेल
  2. 5,000 रुपयांची निवृत्ती रक्कम मिळविण्यासाठी 7 रुपये प्रति दिवस गुंतवावा लागेल
  3. 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी 126 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल
  4. दरमहा 168 रुपये गुंतविल्यास लाभार्थ्याला 4000 रुपये पेन्शन मिळेल
  5. 42 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीवर 1000 रुपये निवृत्ती रक्कम मिळेल

60 वर्षांपूर्वीच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास

लाभार्थी 60 वर्षांपूर्वी मयत झाला तर त्याच्या साथीदाराला, वारसाला पेन्शन मिळते. जोडीदाराचा पण मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसदारांना एकरक्कमी लाभ मिळतो. या योजनेची सुरुवात आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये झाली होती.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.