American Indians Unicorns | भाऊ, अमेरिकेतही भारतीयांचा डंका, अर्धेअधिक उद्योजक भारतीयच की राव!
American Indians Unicorns | अमेरिकत भारतीय केवळ नोकऱ्या करण्यासाठीच जातो हा गोड गैरसमज या बातमीने दूर होईल. अमेरिकेतील नवउद्योजकात 55 टक्क्यांहून अधिक जण भारतीय आहेत. त्यांच्या उद्योगांचे भांडवल काही अब्ज डॉलर आहे.
American Indians Unicorns | अमेरिकेत (America) भारतीय केवळ नोकऱ्या करण्यासाठीच जातो हा गोड गैरसमज या बातमीने दूर होईल. अमेरिकेतील नवउद्योजकात 55 टक्क्यांहून अधिक जण भारतीय आहेत. त्यांच्या उद्योगांचे भांडवल काही अब्ज डॉलर आहे. अमेरिकेतील निम्म्याहून अधिक स्टार्ट-अप्सची (Startup) किंमत 1 अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. भारतीय वंशांच्या नवउद्योजकांनी तिथल्या स्टार्टअप्समध्ये आघाडीच घेतली नसून मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध केला आहे. भारतीयांचा (Indians) खणखणीत नाणे वाजले आहे. जगातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओपदी भारतीयांना पसंती देण्यात येत आहे. या कंपन्यांची धुरा भारतीय मोठ्या यशस्वीरित्या सांभाळत आहेत. भारतीय टँलेंटला जगाने सलामी दिली आहे. अमेरिकेतील युनिकॉर्न कंपन्यांमध्ये (Unicorn Companies) अर्ध्याअधिक कंपन्या या भारतीयांच्या आहेत. आर्थिक व्यवस्था मजबूत होत असताना इतर देशातही भारतीयांनी आपल्या देशाची मान उंचावली आहे. ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
66 कंपन्या टॉपमध्ये
भारतीयांनी केवळ कंपन्या स्थापन केल्या नाहीत. तर त्या यशस्वीपणे चालवत सुद्धा आहेत. या कंपन्यांची उलाढालच कित्येक अब्ज डॉलर आहेत. अमेरिकेच्या निम्म्याहून अधिक स्टार्ट-अप्सची सुरुवात भारतीयांनी केली आहे. 582 पैकी 319 युनिकॉर्न कंपन्या भारतीयांच्या आहेत. हा वाटा 55 टक्क्यांहून पुढे जातो. या प्रत्येक युनिकॉर्नचे भागभांडवल 1 अब्ज डॉलर्स अथवा त्याहून अधिक आहे. एवढ्यावरच ही चमकदार कामगिरी थांबते असे नाही. तर दुसऱ्या स्थानी सुद्धा भारतीयांचाच डंका आहे. ज्या 54 अब्ज डॉलर्सच्या कंपन्या आहेत, त्यात भारतीयांचे प्रमाण अत्यंत लक्षणीय आहे. म्हणजे भारतीयांच्या पुढच्या पिढ्यांनी नोकरदाराची झूल बाजूला सारुन चक्क अमेरिकेच्या उभारणीत वाटा देऊन परतफेड केली आहे.
स्थलांतरीतांचा मोठा वाटा
अमेरिकेच्या उद्योगांमध्ये भारतीयांनी मोठी झेप घेतली आहे. या यादीत भारतीय 66 कंपन्यांसह अव्वल आहेत. अमेरिकेतील उद्योगांमध्ये स्थलांतरीत संस्थापकांचा वाटा मोठा आहे. दुसऱ्या स्थानी चिमुकला इस्त्रायलचे उद्योजक आहे. त्यानंतर ब्रिटन, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, युक्रेन, इराण, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, नायजेरिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अर्जेंटिना आणि इतर अनेक देशांनीही अमेरिकेच्या स्टार्ट-अप इकोसिस्टममध्ये योगदान दिले आहे, असे नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी (NFAP च्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
या भारतीयांचा डंका
या अहवालात 10 मोठ्या उद्योजकांची नावे उघड करण्यात आली आहे. ज्यांनी केवळ एका उद्योगाची स्थापना केलेली नाही. तर दोन अथवा त्यापेक्षा अधिक युनिकॉर्नची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. एलन मस्क, मोहित आरोन, ज्योती बन्सल, आशुतोष गर्ग, अजित सिंग, अल गोल्डस्टीन, नौबर अफेयान, इग्नासियो मार्टिनेझ, आयन स्टोइका आणि सेबेस्टियन थरुन यांचा समावेश आहे. यातील चार उद्योजकांचा भारतात जन्म झाला आहे. स्थलांतरानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.