5G Spectrum Auction | 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरुच, आतापर्यंत 1.5 लाख कोटींची बोली

5G Spectrum Auction |आतापर्यंत सर्वात मजबूत बोली उत्तर प्रदेश पूर्व सर्कलसाठी लावण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून प्रत्येक फेरीत कंपन्या या सर्कलसाठी आग्रही आहेत.

5G Spectrum Auction | 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरुच, आतापर्यंत 1.5 लाख कोटींची बोली
5G लिलाव अंतिम टप्प्यातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 2:16 PM

5G Spectrum Auction | 5G स्पेक्ट्रमचा लिलाव (5G Spectrum Auction) रविवारी सहाव्या दिवशीही सुरू आहे. या लिलाव प्रक्रियेत मोबाईल कंपन्या (Mobile Companies) गेल्या सहा दिवसांपासून अल्ट्रा हायस्पीड इंटरनेटसाठी (Ultra Highspeed Internet) बोली लावत आहेत. गेल्या पाच दिवसांत 1,49, 966 कोटी रुपयांच्या बोली लागल्या आहेत. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी एंटरप्रायझेस या देशातील चार प्रमुख कंपन्या स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी झाल्या आहेत. रविवारी 31 व्या फेरीने बोली सुरू करण्यात आली असून, अहवाल येईपर्यंत ती सुरू होती.आतापर्यंत सर्वात मजबूत बोली उत्तर प्रदेश पूर्व सर्कलसाठी (East Circle) लावण्यात आलेली आहे. गेल्या 15 दिवसांच्या प्रत्येक फेरीत कंपन्या या सर्कलसाठी आग्रही आहेत. ही बोली 1800 मेगाहर्ट्झसाठी आहे. सहाव्या दिवशी, या 5G क्रांतीसाठी बोली सुरु असली तरी ती अंतिम टप्प्यात आली आहे. या बोलींचा निकाल कधीही जाहीर करण्यात येऊ शकतो.

काय म्हणाले दूरसंचार मंत्री

शनिवारी टेलिकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव सुमारे दीड लाख कोटी रुपयांवर पोहोचला. लिलावाचे परिणाम खूप चांगले आहेत आणि आतापर्यंत कंपन्यांनी स्पेक्ट्रम खरेदीसाठी 1,49,966 कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. 5G लिलावावरून हे स्पष्ट झाले आहे की दूरसंचार उद्योगाला पुढे जायचे आहे. आता हा उद्योग अडचणीतून बाहेर आला असून विकासाच्या टप्प्यात आल्याचे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. या लिलावामुळे दूरसंचार क्षेत्रातील मरगळ झटकल्या गेल्याचे चिन्ह आहेत.

हे सुद्धा वाचा

5G सेवेचे फायदे

मुकेश अंबानींचा रिलायन्स जिओ, सुनील मित्तलची भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि गौतम अदानी यांची अदानी एंटरप्रायझेस या कंपन्या 5G स्पेक्ट्रम लिलावात सहभागी होत झाल्या आहेत. 5G स्पेक्ट्रमवर 4G पेक्षा 10 पट वेगवान इंटरनेट मिळण्याचा दावा केला जात आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही आणि कोट्यवधी उपकरणांना रिअल टाइममध्ये डेटा शेअर करण्याची सुविधा मिळेल, असा दावाही करण्यात आला आहे. इंटरनेटचा ज्या भागात अधिक वापर होत असेल अशा ठिकाणी ही संपूर्ण चित्रपट एका सेकंदात डाउनलोड करता येईल. आरोग्य सुविधांशिवाय मोबाइल क्लाउड गेमिंगसाठीही याची पूर्ण मदत होईल.

शनिवारच्या कमाईचे आकडे

शनिवारी बोलींमधून 111-112 कोटी रुपये सरकारच्या खात्यात आले. यामुळे शुक्रवारी कमाई 1,49,855 कोटी रुपयांवरुन 1,49,966 कोटी रुपयांवर पोहोचली. यामध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने मोठ्या बोली लावल्या. उत्तर प्रदेश पूर्व वर्तुळातील स्पेक्ट्रम मागणीत शनिवारी घट झाली आहे, तर गेल्या 5 दिवसांत या भागासाठी कंपन्या आग्रही होत्या. सुरुवातीला या मंडळात 75 ब्लॉकची मागणी होती, तर पुरवठा फक्त 54 ब्लॉकसाठी होता. शनिवारी ही मागणी ५० ब्लॉकपर्यंत खाली आली, जी पुरवठ्यापेक्षा 4 कमी आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.