Crypto Currency | भारतीयांचे क्रिप्टोवरही अफाट प्रेम! अमेरिकेनंतर सर्वाधिक गुंतवणूक, आकडे पाहून अनेकांनी घातले तोंडात बोट!

Crypto Currency | भारतीय सोन्यावर प्रेम करतात हे तर जगजाहीर आहे, पण भारतीयांनी क्रिप्टो करन्सीतही जागतिक पातळीवर मैलाचा दगड गाठला आहे.

Crypto Currency | भारतीयांचे क्रिप्टोवरही अफाट प्रेम! अमेरिकेनंतर सर्वाधिक गुंतवणूक, आकडे पाहून अनेकांनी घातले तोंडात बोट!
इतक्या भारतीयांची क्रिप्टोत गुंतवणूकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 2:12 PM

Crypto Currency | भारतीय सोन्यावर (Gold) प्रेम करतात हे तर जगजाहीर आहे, पण भारतीयांनी क्रिप्टो करन्सीतही (Crypto Currency) जागतिक पातळीवर मैलाचा दगड गाठला आहे. आता भारतीयांनी बिटकॉईन (Bitcoin) किंवा इथरियम (Ethereum) सारख्या क्रिप्टोकरन्सीत किती गुंतवणूक केली याची माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही संयुक्त राष्ट्राने (United Nation) प्रसिद्ध केलेला अहवाल तपासू शकता. या अहवालानुसार, अमेरिका सुद्धा या आभासी चलनाच्या गुंतवणूकदारांमध्ये टॉप 5 मध्ये नाही. परंतू, अमेरिकेच्या खालोखाल भारताचा क्रमांक आहे. गेल्या तीन वर्षांत जगासह भारतावर कोरोना महामारीचे आरिष्ट आले. तर भूराजकीय वादात ही अनेक अर्थव्यवस्था भरडल्या गेल्या. असे असतानाही जगातील अनेक गुंतवणूकदारांनी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये 7 टक्के भारतीयांनी गुंतवणूक (Investment) केली आहे. कोरोना काळात घरात असल्याने आणि सोप्या, सहज पद्धतीने गुंतवणूक करता येत असल्याने अनेकांनी क्रिप्टोचा मार्ग धरला.

युक्रेन सर्वात आघाडीवर

व्यापार आणि विकासाशी संबंधित संयुक्त राष्ट्र संघटनेने (UNCTAD) हा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, 2021 मध्ये, विकसीत राष्ट्रांसोबतच विकसनशील राष्ट्रांनी ही क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केली आहे. 20 पैकी 15 विकसनशील देशांतील गुंतवणूकदारांनी क्रिप्टोचा मार्ग धरला आहे. युक्रेन 12.7 टक्के, रशिया 11.9 टक्के, व्हेनेझुएला 10.3 टक्के, सिंगापूर 9.4 टक्के, केनिया 8.5 टक्के आणि अमेरिका 8.3 टक्के अशी या यादीतील देशांचा क्रम आहे.

हे सुद्धा वाचा

भारताचा 7 वा क्रमांक

2021 मध्ये 7.3 टक्के भारतीयांनी क्रिप्टो चलनात गुंतवणूक केली होती. क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केलेल्या टॉप 20 जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताचा 7 वा क्रमांक आहे. UNCTAD अहवालानुसार, कोविड-19 महामारीच्या काळात जगभरात क्रिप्टोकरन्सीचा वापर झपाट्याने वाढला आहे आणि यामध्ये विकसनशील देशांचा समावेश आहे. वास्तविक भारतासह अनेक देशांनी क्रिप्टोला अजून ही मान्यता दिलेली नाही. भारताने तर उलट उत्पन्नावर कर ही आकारला आहे. क्रिप्टोतील गुंतवणूक अजूनही सुरक्षित मानण्यात येत नाही.

डिजिटल चलनाची वाटचाल अवघड

“All that glitters is not gold: The high cost of leaving cryptocurrencies unregulated” असा या अहवालाचे नाव आहे. अनेक देशात डिजिटल चलन महागाईशी लढण्यासाठी वापरले जात आहे. पण तरीही बाजारात डिजिटल चलनाची अलीकडे मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे क्रिप्टो चलनासमोर मोठे आव्हान आहे हे समजून येते. अनेक अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँकासह जागतिक बँकेने ही क्रिप्टोपासून नागरिकांना चार हात दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.