नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक सुरु आहे. आज या बैठकीत रेपो दरात किती वाढ होईल याचा निर्णय होईल. सर्वसामान्य भारतीयांना महागाईचा फटका बसेल की महागाईत आरबीआय दिलासा देईल हे लवकरच समोर येईल. एका अंदाजानुसार, आरबीआय रेपो दरात (Repo Rate) 25 बेसिस पॉईंटची वाढ करेल. जर ही दरवाढ झाली तर ही सलग 7 वी दरवाढ ठरेल. यामुळे रेपो दर गेल्या 7 वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहचेल. पण यानंतर रेपो दर न वाढविण्याचा निर्णय ही घोषीत होण्याची शक्यता आहे. दरवाढ झाल्यास वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यात (Loan EMI) वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुखाचे दिवस अजून तरी येणार नाहीत, हे नक्की.
250 बेसिस पॉईंटची वाढ
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वात 3, 5 आणि 6 मार्च रोजी आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरु आहे. आज बैठक समाप्तीनंतर आरबीआय गव्हर्नर व्याजदरात वाढीचा घोषणा करण्याची शक्यता आहे. भारतीय केंद्रीय बँकेने आतापर्यंत रेपो रेट दरात सहा वेळा वाढ केली आहे. ज्या दरावर इतर बँकांना आरबीआय उधार कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हणतात. मे 2022 पासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये 250 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षातील ही पहिली तर या वर्षातील दुसरी वाढ ठरेल. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने यापूर्वी रेपो दर 25 बीपीएसने वाढवला होता.
ग्राहक निर्देशांक किती
ग्राहक मूल्य निर्देशाकावर (CPI) आधारीत महागाई जानेवारी 6.52 टक्के तर फेब्रुवारी महिन्यात 6.44 टक्के होती. अजूनही किरकोळ महागाई आरबीआयच्या 6 टक्के या प्रमाणित धोरणापेक्षा अधिक आहे. परिणामी आता रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. एमपीसीची बैठक 3 एप्रिल पासून सुरु होत आहे
महागाईचा मूड काय
देशात येत्या काही महिन्यात महागाई कमी होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. एप्रिल आणि मे महिन्यात महागाईवर लगाम लागण्याची शक्यता नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता पण मावळली आहे. गेल्या मे महिन्यात करात कपात करण्यात आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत होता. गेल्या तीन महिन्यांपासून कच्चा तेलाचे भाव घसरणीवर होते. आत कच्चा तेलाने उसळी घेतली आहे. त्यामुळे महागाईचा मूड इतक्या लवकर बदलेल असे वाटत नाही.
अशी झाली वाढ
आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता. 7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे.