7th Pay Commission Latest News | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनीही गेल्यावेळी महागाई भत्ता (DA) वाढवला. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीएही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government) धरतीवर 34 टक्के इतका करण्यात आला. महागाई भत्त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांची बरोबरी साधण्यात आली. आता महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. आता सरकारने जूनपासूनच तिसरा हप्ता (Third Installment) पाठवण्यास सुरुवात केली आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याची रक्कम पडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात फरक दिसून येईल. पगारात (Payment) डीएचा वाढीव हप्ता ही मिळेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत (7th Pay Commission) थकबाकीचा (outstanding) तिसरा हप्ता देण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. राज्यातील राजकीय उलथापालथ होण्याआधीच कागदोपत्री कामकाज पूर्ण झाल्याने आता डीए मिळण्यात कुठलीही आडकाठी येणार नाही.
महाराष्ट्रात 2019 मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. 2019-20 पासून आणखी पाच वर्षात कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी पाच हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. याअंतर्गत आतापर्यंत कर्मचाऱ्यांना दोन हप्ते मिळाले आहेत. आता तिसऱ्या हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणे सुरू झाले आहे. या तीन हप्त्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता ही लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना महागाईच्या झळा लागणार नाहीत.
सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले सुरु आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येत आहेत. तुम्ही राज्य सरकारचे कर्मचारी असाल तर तुमचे खाते तपासून पहा. याअंतर्गत अ गटातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांमध्ये 30 ते 40 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर ब गटातील कर्मचाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर क गटातील कर्मचारी वर्गाला 10 ते 15 हजार रुपयांचा आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीएचा लाभ मिळत आहे.
भारतीय ग्राहक दर निर्देशंकावर केंद्रीय कर्मचा-यांना किती महागाई भत्ता देण्यात येणार हे ठरते. जर निर्देशांकात सातत्याने वाढ होत असेल तर महागाई भत्ता ही त्याच प्रमाणात वाढतो. यावर्षाच्या सहामाहीत भारतीय ग्राहक दर निर्देशांकाचे आकडे आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात डीएम मध्ये 4 ते 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अजून जून महिन्याचे आकडे आलेले नाहीत. जर निर्देशंकाने 130 चा आकडा पार केला तर महागाई भत्ता 5 टक्के वाढू शकतो.
महागाई भत्ता कर्मचा-यांना त्यांच्या वेतनाच्या आधारावर देण्यात येतो. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात फरक असतो. तो या क्षेत्रानुसार बदलतो. महागाई भत्ता हा मूळ वेतनाच्या आधारे देण्यात येतो. महागाई भत्त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कर्मचा-यांच्या मूल्य सुचकांआधारे हा भत्ता देण्यात येतो.