GST Collection : केंद्र सरकारची कमाई घटली, एका महिन्यात 8 हजार कोटींचा फटका, कारण ही अजब

GST Collection : केंद्र सरकाचे फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न थोडे घटले आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. अर्थात यामागे एक अजब तर्क लावण्यात आला आहे.

GST Collection : केंद्र सरकारची कमाई घटली, एका महिन्यात 8 हजार कोटींचा फटका, कारण ही अजब
उत्पन्न घटले
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 9:39 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकाचे फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न थोडे घटले आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये (GST Collection in February) 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत वस्तू आणि सेवा कराचे उत्पन्न घटले आहे. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी (February) महिन्याच्या तुलनेत यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 1.49 लाख कोटी रुपयांहून जीएसटी कलेक्शन जास्त झाले आहे. हा सलग 12 वा महिना आहे. जेव्हा जीएसटी कलेक्शन 1.40 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

अर्थमंत्रालयाने याविषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये 11,931 जीएसटीच्या माध्यमातून सर्वात जास्त सरचार्ज कलेक्शन पहायला मिळाले. जानेवारी महिन्यात 1.57 लाख कोटींपेक्षा अधिकचे जीएसटी कलेक्शन झाले. हा इतिहासातील दुसरा सर्वात मोठे महसूल आहे. एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झाले होते. हा रेकॉर्ड अजून मोडीत निघालेला नाही.

अर्थमंत्रालयाने करानुसार कर संकलनाचे विवरण सादर केले आहे. त्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण 1,49,577 कोटी रुपयांचा कर संकलन करण्यात आला. यामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 27,662 कोटी रुपये आहे. तर राज्यांकडून मिळालेला महसूल, जीएसटी (एसजीएसटी) संकलन 34,915 कोटी रुपये आहे. या दोघांचे एकीकृत संकलन जीएसटी (आईजीएसटी) 75,069 कोटी रुपये झाले आहे. याशिवाय 11,931 कोटी रुपयांचा उपकर ही जमा करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

या फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कर संकलनातून कमी महसूल प्राप्त झाला आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. अर्थात यामागे एक अजब तर्क लावण्यात आला आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात जवळपास तीन दिवस कमी असतात. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो. त्यामुळे या तीन दिवसात जीएसटी जमा झाला नाही. त्याचा फटका बसला. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 1.49 लाख कोटी रुपयांहून जीएसटी कलेक्शन जास्त झाले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात एकूण जीएसटी महसूल हा 12 टक्के असण्याचा अंदाज वर्तवला होता. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 8.54 लाख कोटींचा जीएसटी महसूल जमा करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. जीएसटी संकलनातील 1.5 लाख कोटी रुपयांचा आकडा आता नेहमीचा आहे, येत्या वर्षात हा आकडाही पार करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी व्यक्त केला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.